advertisement

पोलिसाच्या मोबाईलवर आली ती जाहिरात; एक क्लिक अन् मोठा गेम, डी-मार्टमध्ये जाताच बसला धक्का

Last Updated:

मुंढवा परिसरात राहणारे तक्रारदार पोलीस हवालदार ११ डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, त्यांच्या इन्स्टाग्रामवर "अँड्रॉइड टीव्हीवर सर्व चॅनेल्स फ्री दिसणार" अशी एक जाहिरात आली

पोलिसाला गंडवलं (प्रतिकात्मक फोटो)
पोलिसाला गंडवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: सायबर भामटे आता कोणालाही सोडत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 'फ्री मध्ये टीव्ही चॅनेल' पाहण्याच्या मोहाने चक्क पुणे पोलीस दलातील एका ४४ वर्षीय हवालदाराची ७१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीवर क्लिक करताच मोबाईल हँग झाला आणि काही वेळातच बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
मुंढवा परिसरात राहणारे तक्रारदार पोलीस हवालदार ११ डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, त्यांच्या इन्स्टाग्रामवर "अँड्रॉइड टीव्हीवर सर्व चॅनेल्स फ्री दिसणार" अशी एक जाहिरात आली. हवालदारांनी उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक केले. क्लिक करताच त्यांचा मोबाईल अचानक हँग झाला. त्यांनी फोन स्विच ऑफ करून पुन्हा चालू केला, तेव्हा सर्व काही सामान्य वाटलं.
advertisement
दुसऱ्या दिवशी, १२ डिसेंबर रोजी हे पोलीस हवालदार डी-मार्टमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. बिल भरताना त्यांनी गुगल पे ओपन केले असता, त्यांच्या खात्यातून ४१ हजार आणि ३० हजार असे एकूण ७१ हजार रुपये परस्पर डेबिट झाल्याचे दिसले. हे पैसे यशराज बैरागी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाने या अर्जाची चौकशी केली असता, हा व्यवहार मध्य प्रदेशातील शाजापूर येथील यशराज बैरागी याच्या खात्यावर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराज डोके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे उच्चशिक्षित आणि सरकारी यंत्रणेतील व्यक्तींनीही अज्ञात लिंकवर क्लिक करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पोलिसाच्या मोबाईलवर आली ती जाहिरात; एक क्लिक अन् मोठा गेम, डी-मार्टमध्ये जाताच बसला धक्का
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement