समृद्धी महामार्ग 5 दिवस राहणार बंद, पाहा काय असणार पर्यायी मार्ग?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक होत असते. पण छत्रपती संभाजीनगर जवळ या महामार्गावरी वाहतूक पाच दिवस बंद राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर: समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान समृद्धी महामार्ग पाच दिवस रोज तीन तासांसाठी बंद राहणार आहे. महामार्गावर पॉवरग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25, 26 ऑक्टोबर रोजी तीन तास बंद राहणार आहे.
वाहतूक कधी बंद राहणार?
मंगळवार दि. 10 ऑक्टोबर ते गुरुवार दि. 12 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 12 ते 3.30 या काळात महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी माहिती दिलीय.
advertisement
काय असणार पर्यायी मार्ग?
छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गासाठी महामार्गावरील जालना इंटरचेंज ते सावंगी इंटरचेंज दरम्यान समृद्धी महामार्गावरून नागपूरकरडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंजमधून बाहेर पडून निधोना एमआयडीसीमार्गे राष्ट्रीय महामार्ग 753 अ जालना- छत्रपती संभाजीनगरमार्गे केंब्रिज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल.
advertisement
शिर्डीहून नागपूरकडे जाणारी वाहतूक
समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक सावंगी इंटरचेंज येथून बाहेर पडून पर्यायी मार्गानेच विरुद्ध दिशेने असणार आहे. पुढे निधोना जालना इंटरचेंज येथे महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल, असे खलसे यांनी सांगितले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
October 05, 2023 8:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
समृद्धी महामार्ग 5 दिवस राहणार बंद, पाहा काय असणार पर्यायी मार्ग?