संभाजीनगरात गोळीबाराचा थरार, सराईत गुंड तेजाने मैत्रिणीवर झाडल्या गोळ्या, रात्री 12 वाजता भेटायला गेला अन्...

Last Updated:

Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला आहे. मध्यरात्री बारा वाजता संबधित गुन्हेगार आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी आरोपीनं तिच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सैय्यद फैजल उर्फ तेजा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या खूनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी आणि अमली पदार्थ तस्करी संदर्भात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तेजा हा सोमवारी रात्री उशिरा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी त्याने मैत्रिणीवर गोळीबार केला. यातील एक गोळी मैत्रिणीच्या हाताला लागली आहे. दैव बलवत्तर म्हणून तरुणी थोडक्यात बचावली आहे.
advertisement
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील किलेअर्क परिसरात रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. राखी मुरमरे असं 22 वर्षीय जखमी मैत्रिणीचे नाव आहे. सध्या तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दाखल घेत अधिक तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement

कोण आहे सराईत तेजा?

तेजा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि अमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील अनेक गुन्हे दाखल आहेत. तेजा हा सुरुवातीला भुरटा चोर होता. तो लहान मोठ्या चोऱ्या करायचा. मात्र नंतर तो काही सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि तोही सराईत बनला. २०२१ मध्ये एका अल्पवयीन मैत्रिणीने तेजावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्याने चाकुने तिला भोसकल्याची देखील नोंद आहे. याशिवाय त्याने संभाजीनगरमध्ये एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला देखील केला होता. याच सराईत गुंडाने आता आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरात गोळीबाराचा थरार, सराईत गुंड तेजाने मैत्रिणीवर झाडल्या गोळ्या, रात्री 12 वाजता भेटायला गेला अन्...
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement