advertisement

Railway Udpate: रेल्वेचा रोलिंग ब्लॉक! छ. संभाजीनगर नव्हे, ‘ही’ गाडी आता जालन्यातून सुटणार, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Railway Update: या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियोजन करताना विलंबाची शक्यता लक्षात घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Railway Udpate: रेल्वेचा रोलिंग ब्लॉक! छ. संभाजीनगर नव्हे, ‘ही’ गाडी आता जालन्यातून सुटणार, पाहा वेळापत्रक
Railway Udpate: रेल्वेचा रोलिंग ब्लॉक! छ. संभाजीनगर नव्हे, ‘ही’ गाडी आता जालन्यातून सुटणार, पाहा वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर : हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची आवडती असलेली गुंटूर एक्स्प्रेस येत्या 4 फेब्रुवारीपासून 27 मेपर्यंत थेट छत्रपती संभाजीनगरहून न सुटता जालना स्थानकातून रवाना होणार आहे. या काळात रेल्वे सायंकाळी 5.30 वाजता जालना येथून सुटेल. मात्र, या वेळेस छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जाणारी कोणतीही थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जालन्यापर्यंत एसटी महामंडळाची बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.
संभाजीनगरच्या सिडको बसस्थानकातून दर अर्ध्या तासाला जालन्यासाठी एसटी बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, करमाड, दिनेगाव, बदनापूर ते जालना या रेल्वे मार्गावर रोलिंग ब्लॉक घेण्यात येणार असल्याने 4 फेब्रुवारी ते 27 मे या कालावधीत दर आठवड्याला मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम जाणवणार आहे.
advertisement
गुंटूरहून येणारी गुंटूर एक्स्प्रेसही या काळात केवळ जालना स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे त्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवासासाठी पर्यायी रेल्वे, एसटी बस किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागेल. सध्या नियमित वेळापत्रकानुसार ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर स्थानकातून दुपारी 4.30 वाजता सुटून जालना, परभणी, परळी, लातूर रोड, उदगीर मार्गे सिकंदराबाद आणि पुढे गुंटूरपर्यंत धावते.
advertisement
या रेल्वे उशिरा धावणार 
3 फेब्रुवारी ते 26 मे या कालावधीत काचीगुडा-नगरसोल क्रमांक 17661 ही रेल्वे सेलू ते जालना या टप्प्यात सुमारे दीड तास उशिराने पोहोचणार आहे. तसेच काचीगुडा-नगरसोल क्रमांक 17687 या दुसऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला असून, ती छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान अंदाजे 20 मिनिटे विलंबाने धावेल. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियोजन करताना विलंबाची शक्यता लक्षात घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Railway Udpate: रेल्वेचा रोलिंग ब्लॉक! छ. संभाजीनगर नव्हे, ‘ही’ गाडी आता जालन्यातून सुटणार, पाहा वेळापत्रक
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement