advertisement

70 हजारात सौदा, गर्भातच व्हायची मुलीची हत्या, MBBS डॉक्टरही सामील, संभाजीनगरात मोठं रॅकेट

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारं गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं आहे. दोन सख्ख्या बहिणी एका नर्सच्या मदतीने हे रॅकेट चालवत होत्या.

संभाजीनगरात गर्भपाताचं रॅकेट उद्ध्वस्त
संभाजीनगरात गर्भपाताचं रॅकेट उद्ध्वस्त
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपाताचे प्रमाण वाढले आहेत. महिनाभरापूर्वी इथं एक गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं होतं. एमआयडीसी सीडको परिसरात एका २६ वर्षीय विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला जात होता. गरोदर महिलेला पोटावर झोपवून अत्यंत क्रूर पद्धतीने गर्भपात केला जात होता. हे प्रकरण ताजं असताना आता छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारं दुसरं गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं आहे.
दोन सख्ख्या बहिणी एका नर्सच्या मदतीने हे रॅकेट चालवत होत्या. त्या मागील दीड वर्षांपासून घरातच गर्भपात करत होत्या. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या रॅकेटचे धागेदोरे रेकॉर्डवरील गर्भपात करणाऱ्या कुख्यात डॉक्टरांपर्यंत पोहोचले आहे. गर्भपात करण्यासाठी आरोपी महिलांकडून तब्बल ७० ते ८० हजार रुपयांचे पॅकेज सांगितलं जात होतं.
पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी गर्भपाताचे हे मोठं रॅकेट उघडकीस आणलं. यात वर्षा बाबासाहेब जाधव आणि उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या दोघींना रंगेहात पकडलं. त्यांच्याकडे महिला रुग्णांना पाठवणाऱ्या सिल्लोडच्या डॉ. विकास मिठाराम आहेर यालाही त्याच्या रुग्णालयातून अटक केली. वर्षाची मुख्य साथीदार ज्योती पवार मात्र पसार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
advertisement
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथून अटक केलेला डॉ. आहेर हा MBBS असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. पूर्वी छोटा दवाखाना चालवणाऱ्या आहेरने मागील दोन वर्षात ३ मजली इमारत उभी केली. ही इमारत गर्भपाताच्या बेकायदेशीर जमा झालेल्या पैशांतून बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
70 हजारात सौदा, गर्भातच व्हायची मुलीची हत्या, MBBS डॉक्टरही सामील, संभाजीनगरात मोठं रॅकेट
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement