Navratri 2025 : दर्शनदूत! वयोवृद्धांना घडवतात देवीचे दर्शन, 4 वर्षांपासून करतात काम, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हा उपक्रम त्यांनी चार वर्षांपासून सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील जे वृद्ध आहेत किंवा जे अपंग आहेत अशा सर्वांना देवीचे दर्शन घेण्यासाठी ते मदत करत असतात.
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत म्हणजे कर्णपुरा माता. नवरात्रात नऊ दिवस या ठिकाणी मोठा उत्सव असतो. त्यासोबतच मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी सर्व लोक जास्त संख्येने येत असतात पण जे वयोवृद्ध आहेत किंवा जे अपंग व्यक्ती आहेत अशा सर्वांनी देखील देवीचे दर्शन घ्यावे अशी त्यांची इच्छा छत्रपती संभाजीनगर शहरातील ॲम्बुलन्स हेल्प रायडर यांच्यातर्फे पूर्ण होत असते.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ॲम्बुलन्स हेल्प रायडर हा एक ग्रुप आहे. या ग्रुप अंतर्गत त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. तो उपक्रम म्हणजे दर्शनदूत. हा उपक्रम त्यांनी चार वर्षांपासून सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील जे वृद्ध आहेत किंवा जे अपंग आहेत अशा सर्वांना देवीचे दर्शन घेण्यासाठी ते मदत करत असतात. त्यांच्या घरापासून घेऊन मंदिरापर्यंत दर्शन करून आणतात आणि त्यानंतर त्यांना परत त्यांच्या घरी नेऊन सोडण्याचे काम करतात. या 4 वर्षांमध्ये 1700 पेक्षा जास्त वयोवृद्धांना आणि अपंगांना दर्शन घडवून आणलेले आहे.
advertisement
मंदिरामध्ये त्यांचे सर्व स्वयंसेवक असतात, ते सर्व वयोवृद्धांना देवीचे दर्शन घडवून आणतात, त्यांना सर्व मदत करत असतात. अशा पद्धतीने हे गेल्या 4 वर्षांपासून काम करतात. यासाठी आधी नावनोंदणी करावी लागते आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घरून घेऊन मंदिरात दर्शन करायला घेऊन जात असतात. त्यासोबतच दर्शन झाल्यानंतर ते सर्वांना एक कर्णपुरा मातेचा फोटो देखील देतात. तर अशा पद्धतीने त्यांचे हे सर्व काम चालते.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 30, 2025 3:48 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Navratri 2025 : दर्शनदूत! वयोवृद्धांना घडवतात देवीचे दर्शन, 4 वर्षांपासून करतात काम, Video









