political news : अंबादास दानवेंच्या आधी या नेत्याला होती विधान परिषदेची ऑफर, खैरेंचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:sachin Salve
Last Updated:
'शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच छ. संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती होती'
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
छ.संभाजीनगर, 26 सप्टेंबर : अंबादास दानवेंच्या ऐवजी विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ॲाफर होती. पण मराठा समाजाच्या चळवळीसाठी पाटलांनी नकार दिला होता, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाटे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पाटील प्रतिवर्षी त्यांच्या अजिंक्य देवगिरी निवासस्थानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज चंद्रकांत खैरे हे विनोद पाटील यांच्याकडे गणपती दर्शनासाठी आले होते.
advertisement
यावेळी बोलताना खैरे यांनी, सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसंच बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेच्या फुटी अगोदर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ऐवजी विधानपरिषदेची ॲाफर होती, असा खुलासा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच छ. संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती हे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना होती. तेव्हा विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची विचारणा सुद्धा झाली होती. परंतु विनोद पाटील यांनी समाजाच्या प्रश्नासाठी तुर्तास विधानपरिषदेसाठी नकार दिला. त्यामुळे सध्याचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाली, असंही खैरे म्हणाले.
advertisement
विशेष म्हणजे, याआधाही अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. चंद्रकांत खैरे यांनी कोण अंबादास दानवे असा सवाल उपस्थितीत केला होता. त्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरे गटांमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले होते.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 26, 2023 3:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
political news : अंबादास दानवेंच्या आधी या नेत्याला होती विधान परिषदेची ऑफर, खैरेंचा मोठा गौप्यस्फोट