काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज, भाजपकडून शिवरकरांचं आव्हान?

Last Updated:

Prashant Jagtap Nomination Pune Mahanagar Palika: शरद पवार यांची साथ सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी पुणे महानगर पालिकेसाठी अर्ज दाखल केला.

पुणे महानगर पालिकेसाठी प्रशांत जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे महानगर पालिकेसाठी प्रशांत जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. काँग्रेस समर्थक आणि पाठीराख्यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी अतिशय साधेपणाने सोमवारी दुपारी अर्ज भरला. प्रभाग क्रमांक १८ मधून जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अजित पवार यांच्यासोबत जाण्याची आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रशांत जगताप यांनी सन्मानाने चर्चेतून माघार घेत विचारसरणीला प्रमाण मानून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. महानगर पालिका निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी प्रवेश करतेवेळी सांगितले. त्यानुसार सोमवारी दुपारी त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला.
advertisement

प्रशांत जगताप यांच्यासमोर शिवरकरांचं आव्हान?

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवरकर कुटुंबाची ओळख काँग्रेससोबत एकनिष्ठ घराणे अशी राहिलेली आहे. परंतु जगताप यांच्या प्रवेशानंतर उमेदवारीच्या आशा धुसर झाल्याने शिवरकर यांनी तत्काळ भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक १८ मध्ये जगताप विरुद्ध शिवरकर अशी लढत होऊ शकते.
advertisement
वानवडी भागातून अभिजीत शिवरकर यांना भाजप उमेदवारी देऊ शकते. प्रशांत जगताप आणि अभिजीत शिवरकर हे एकेकाळचे चांगले मित्र. आता त्याच मित्रांमध्ये पुणे महानगरपालिकेची लक्षवेधी लढत होऊ शकते, अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत.

प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण काय?

भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत लढण्यासाठी नकार दिला. तेव्हा बेरजेचे राजकारण करण्यात माहीर असलेल्या अजित पवार यांच्याकडून एकत्र लढण्याचा प्रस्ताव अजित पवार यांनी दिला. त्यादिशेने हालचाली सुरू झाल्याने दोन्ही पक्षनेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडायला लागल्या. पुरोगामी पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्यासोबत जाऊ नये, असे प्रशांत जगताप म्हणणे होते. परंतु त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व पाऊल टाकत असल्याचे लक्षात आल्यानंतर राजीनाम्याची तयारी जगताप यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणारच असे संकेत मिळताच जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात राजीनाम्याची घोषणा करून संविधानाच्या बाजूने लढाई सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
advertisement

कोण आहेत प्रशांत जगताप?

प्रशांत जगताप हे पुणे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते राहिले
त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि महापौर म्हणूनही काम केले
शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती
विरोधात असताना सत्ताधाऱ्यांविरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलने करून त्यांना घाम फोडायचे
नीतीमुल्यांनी लढणारे कार्यकर्ते नेतृत्व अशी त्यांची ओळख
advertisement
त्यांचे वडील सुदामराव जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केले होते
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज, भाजपकडून शिवरकरांचं आव्हान?
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement