Brigitte Bardot Dies: 4 लग्न, 17 अफेयर्स, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात आढळला मृतदेह, इंडस्ट्रीवर शोककळा!

Last Updated:
Brigitte Bardot Dies: फ्रेंच सिनेमाची क्वीन आणि एकेकाळी संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेड लावणारी दिग्गज अभिनेत्री ब्रिजिट बार्डोट आता आपल्यात नाही.
1/9
मुंबई: फ्रेंच सिनेमाची क्वीन आणि एकेकाळी संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेड लावणारी दिग्गज अभिनेत्री ब्रिजिट बार्डोट आता आपल्यात नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी या महान अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.
मुंबई: फ्रेंच सिनेमाची क्वीन आणि एकेकाळी संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेड लावणारी दिग्गज अभिनेत्री ब्रिजिट बार्डोट आता आपल्यात नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी या महान अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.
advertisement
2/9
दक्षिण फ्रान्समधील राहत्या घरी ब्रिजिट यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने केवळ फ्रेंच सिनेसृष्टीच नाही, तर जागतिक मनोरंजन विश्वातील एक पर्व संपलं आहे.
दक्षिण फ्रान्समधील राहत्या घरी ब्रिजिट यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने केवळ फ्रेंच सिनेसृष्टीच नाही, तर जागतिक मनोरंजन विश्वातील एक पर्व संपलं आहे.
advertisement
3/9
१९३४ मध्ये पॅरिसमधील एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या ब्रिजिट यांनी बॅले डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली. मात्र, नशिबाने त्यांना अभिनयाकडे खेचलं. १९५० च्या दशकात ब्रिजिट यांनी फ्रेंच सिनेमात खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणि बोल्डनेस आणला.

4/9
५० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केलं. त्यांचा १९५६ मधील 'अँड गॉड क्रिएटेड वुमन' हा चित्रपट आजही मास्टरपीस मानला जातो. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, १९७३ मध्ये जेव्हा त्या यशाच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी अचानक अभिनयाला रामराम ठोकला आणि उरलेलं आयुष्य प्राण्यांच्या सेवेसाठी वाहून दिलं.

5/9
ब्रिजिट या केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या तिखट शब्दांसाठीही ओळखल्या जात होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात त्या प्रचंड वादग्रस्त ठरल्या.
ब्रिजिट या केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या तिखट शब्दांसाठीही ओळखल्या जात होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात त्या प्रचंड वादग्रस्त ठरल्या.
advertisement
6/9
मुस्लीम समुदायाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्यावर अनेकदा दंड ठोठावण्यात आला होता.
मुस्लीम समुदायाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्यावर अनेकदा दंड ठोठावण्यात आला होता. "मुसलमान आपल्या देशाची संस्कृती नष्ट करत आहेत," असं विधान त्यांनी आपल्या वेबसाईटवर केलं होतं, ज्यासाठी त्यांना १५,००० युरोचा दंड भरावा लागला.
advertisement
7/9
२००३ मध्ये आलेल्या त्यांच्या 'ए क्राय इन द सायलेन्स' या पुस्तकात त्यांनी समलैंगिक लोक आणि स्थलांतरितांबद्दल आक्षेपार्ह मतं मांडली होती, ज्याची जगभर निंदा झाली.
२००३ मध्ये आलेल्या त्यांच्या 'ए क्राय इन द सायलेन्स' या पुस्तकात त्यांनी समलैंगिक लोक आणि स्थलांतरितांबद्दल आक्षेपार्ह मतं मांडली होती, ज्याची जगभर निंदा झाली.
advertisement
8/9
ब्रिजिट यांचं खासगी आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं. त्यांनी ४ वेळा लग्न केलं, पण एकाही नात्यात त्या फार काळ टिकल्या नाहीत. तब्बल १७ प्रेमप्रकरणं गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने एकदा मुलाखतीत म्हटलं होतं,
ब्रिजिट यांचं खासगी आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं. त्यांनी ४ वेळा लग्न केलं, पण एकाही नात्यात त्या फार काळ टिकल्या नाहीत. तब्बल १७ प्रेमप्रकरणं गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने एकदा मुलाखतीत म्हटलं होतं, "मी नेहमीच पॅशन शोधत राहिले. जेव्हा जोडीदाराबद्दलचं आकर्षण कमी व्हायचं, तेव्हा मी बॅग भरायचे आणि घर सोडून निघून जायचे." प्रेमाच्या बाबतीत त्या कधीच कोणाला बांधील राहिल्या नाहीत.
advertisement
9/9
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ब्रिजिट यांना 'शतकातील महान व्यक्तिमत्त्व' म्हणून आदरांजली वाहिली.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ब्रिजिट यांना 'शतकातील महान व्यक्तिमत्त्व' म्हणून आदरांजली वाहिली. "ती केवळ एक अभिनेत्री नव्हती, तर ती फ्रान्सची ओळख होती," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement