सुनील तटकरेंच्या घरी काळोखेंच्या हत्येचा कट शिजला, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; रायगडमध्ये खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
खासदार सुनील तटकरेंच्या घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन रचल्याचा खळबळजनक आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
रायगड : खोपोलीत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात ही घटना घडली . या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.या हत्याप्रकरणानंतर राजकारण तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केला आहे. खासदार सुनील तटकरेंच्या घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन रचल्याचा खळबळजनक आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करताना दिसून आला आहे. या हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी खोपोलीत जाऊन काळोखे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.
आम्हाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी काळोखे कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. काळोखेंच्या मारेकऱ्याला सोडणार नाही हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार असा शब्द यावेळी एकनाथ शिंदेंनी दिला आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले महेश थोरवे?
महेश थोरवे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू केले आहे. विरोधकांच्या हत्या यांच्या सांगण्यावरून केल्या जात आहेत. सुनिल तटकरे हे रायगडचा आका आहे. आरोपी रविंद्र देवकर याने चार-पाच दिवसा आधी सुतारवाडी येथे जावून सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत मंगेश काळोखे यांची हत्या करण्याचा प्लान करण्यात आला. या हत्येत सुधाकर घारे यांचा सहभाग आहे. रविंद्र देवकर आणि सुधाकर घारे यांनी प्री प्लान करून मंगेश काळोखे यांची हत्या केली आहे. जोपर्यंत सुधाकर घारेसह 10 आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
advertisement
थोरवेंच्या आरोपावर तटकरे काय म्हणाले?
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.काळोखे यांचा हत्याकांडाची आपण मुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी मागणी करणार आहे, शिवाय या हत्येच्या घटनेनंतर काय आहे हे सर्व बाहेर येणार असे तटकरे म्हणाले. कोणी या घटनेत काय काय केलं ते सुद्धा बाहेर येईल, तसेच मी योग्य वेळ आल्यावर बोलेल असं तटकरे म्हणाले.
advertisement
काळोखेंच्या हत्याप्रकरणावरून रायगडमधील राजकारण तापलं
मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणावरून रायगडमधील राजकारण तापलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. रायगड जिल्ह्याच्या खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला अटक केलीय. मंगेश काळोखेंच्या हत्येवरून आता राजकारण ढवळून निघालं आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनील तटकरेंच्या घरी काळोखेंच्या हत्येचा कट शिजला, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; रायगडमध्ये खळबळ









