advertisement

कृष्णा आंधळेचा काऊंटडाऊन सुरू! CID ने मोठा डाव टाकला, सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी घडामोड

Last Updated:

कृष्णा आंधळे 14 महिने उलटूनही सापडत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

News18
News18
बीड :   बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 14 महिने उलटले तरी, मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला आरोपी अद्याप मोकाटच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कमालीच्या ॲक्शन मोडमध्ये आला असून फरार आरोपीचा छडा लावण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील बहुतांश आरोपी गजाआड असले तरी, मुख्य संशयित आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 14 महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे. या दिरंगाईबाबत न्यायालयाने 'सीआयडी'ला जाब विचारल्यानंतर आता सीआयडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कृष्णा आंधळेची खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीला सीआयडीकडून 1  लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
advertisement

काय आहे प्रकरण?

खंडणी आणि राजकीय वादातून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते आणि आरोपींच्या अटकेसाठी जनआंदोलने उभी राहिली होती. पोलिसांनी या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली, मात्र कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला नाही. तो सतत आपली ठिकाणे बदलून तपास यंत्रणेला चकवा देत आहे.
advertisement

बीड प्रकरणात सीआयडीचा 'मास्टरस्ट्रोक'

14 महिने उलटूनही आरोपी सापडत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता सीआयडीने जाहीर आवाहन केले आहे की, जो कोणी नागरिक या फरार आरोपीचा ठावठिकाणा सांगेल, त्याला 1 लाख रुपये दिले जातील. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, जेणेकरून कोणत्याही भीतीशिवाय नागरिक पुढे येऊ शकतील. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर सीआयडीने आता तांत्रिक तपासासोबतच खबऱ्यांचे जाळेही अधिक घट्ट केले आहे.
advertisement

सीआयडीच्या जाळ्यात  फरार' मासा कधी अडकणार? 

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ येत असतानाच ही घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा आंधळेची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता या एक लाखाच्या बक्षिसाच्या घोषणेनंतर सीआयडीच्या जाळ्यात हा 'फरार' मासा कधी अडकतो, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कृष्णा आंधळेचा काऊंटडाऊन सुरू! CID ने मोठा डाव टाकला, सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी घडामोड
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement