जामखेडमध्ये खळबळ, नृत्यांगणा दिपाली पाटीलने लॉजमध्ये संपवंल जीवन; गूढ वाढलं

Last Updated:

दिपाली पाटील जामखेडमध्ये एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती.

News18
News18
अहिल्यानगर : जामखेडमध्ये नृत्यांगणा दिपाली पाटील या तरूणीने एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या क का केली याचे कारण अद्याप समोर आल नाही, मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील जामखेडमध्ये एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती. सध्या ती मैत्रीणीसोबत जामखेडच्या तपेश्वर भागात भाड्याने राहत होती. मैत्रिणीला बाजारात जाऊन येते सांगून दिपाली घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ झाल्याने दिपाली घरी न आल्याने मैत्रीणीला तिची चिंता वाटू लागली. मैत्रिणीने दिपाली ज्या रिक्षाने बाजारात गेली त्या रिक्षावाल्याला फोन करून चौकशी केली. चौकशीत रिक्षावाल्याने दिपालीला खर्डा रोडवरील एका लॉजवर सोडल्याचे सांगितले.
advertisement

जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे मैत्रीणी संध्याकाळी साडेपाच वाजता त्या लॉजवर पोहचली. फोन करूनही मैत्रीण फोन उचलत नव्हती, अखेर दरवाजा ठोठवाला मात्र कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर वेटरला सांगून दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला तर आत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले . त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. नृत्यांगणा दीपालीने आत्महत्या का केली? हे अजून स्पष्ट झाले नाही. पण या प्रकरणी तिची मैत्रिण हर्षदा रवींद्र कामठे हिच्या तक्रारीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
advertisement

रोहित पवारांकडून शंका उपस्थित

जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जामखेडमध्ये खळबळ, नृत्यांगणा दिपाली पाटीलने लॉजमध्ये संपवंल जीवन; गूढ वाढलं
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement