Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू

Last Updated:

धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाली, तर कारचेही मोठे नुकसान झाले.

News18
News18
अकोला : गणेश विसर्जन करून येणाऱ्या भक्ताच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पातूर-अकोला रस्त्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अकोला शहरातील शिवसेना वसाहतीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाचे विसर्जन कापशी तलावावर पार पडले. विसर्जन करून परतीच्या प्रवासात असताना चार तरुण एकाच दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाली, तर कारचेही मोठे नुकसान झाले.
या अपघातात रामचरण अंधारे याचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल खोंड, विनोद डांगे आणि विकी माळी हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

गणेशोत्सवाच्या उत्साहात अचानक दुःखाचे सावट

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात अचानक दुःखाचे सावट पसरले आहे. मृत आणि जखमी सर्वजण एकाच वसाहतीतील असल्याने स्थानिक नागरिकांनीही रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, भरधाव कारने धडक दिल्याचा प्राथमिक तपासातून उलगडा झाला असून संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
advertisement

परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर

या दुर्दैवी अपघातामुळे कापशी तलावावरून विसर्जन करून परतलेल्या गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गणरायाच्या निरोपाचा आनंद साजरा करत असतानाच या अपघाताने अकोल्यातील जय बजरंग मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement