Hair Care : केस गळतीवर पौष्टिक उपचार, केस गळण्याचं प्रमाण होईल कमी, वाचा सविस्तर माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस गळतीचं कारण अंतर्गत असेल आणि शरीरात पोषक घटकांची कमतरता असू शकते. त्यासाठी विविध पौष्टिक जिन्नस असलेला लाडू हा एक चांगला उपाय आहे.
मुंबई : केस गळतीमुळे त्रासला असाल तर ही माहिती नक्की वाचा. केसांवर विविध उपचार करुन झाले असतील तर एक उपाय नक्की करुन बघा. कारण अनेकदा बाह्य उत्पादन लावून उपयोग होत नसेल तर याचा अर्थ कारण आत दडलंय.
केस गळतीचं कारण अंतर्गत असेल आणि शरीरात पोषक घटकांची कमतरता असू शकते. त्यासाठी विविध पौष्टिक जिन्नस असलेला लाडू हा एक चांगला उपाय आहे.
advertisement
केस गळती थांबवण्यासाठी लाडू कसे बनवायचे ?
केस गळती थांबवण्यासाठी लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धा कप काळे तीळ, अर्धा कप भोपळ्याच्या बिया, अर्धा कप अक्रोड, एक चमचा मोरिंगा पावडर, एक चमचा आवळा पावडर आणि गरजेनुसार तूप आणि सीडलेस म्हणजे बिया नसलेले खजूर लागतील.
advertisement
प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असलेले हे लाडू बनवण्यासाठी, प्रथम तीळ, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया मंद आचेवर भाजा. चार ते पाच मिनिटं भाजल्यानंतर, त्यांना थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमधे टाकून बारीक करा. आता मोरिंगा पावडर आणि आवळा पावडर एकत्र करा. त्यात खजूरही घाला. सर्व पदार्थ एकत्र करून बारीक करा.
advertisement
सर्व पदार्थ एकत्र केल्यानंतर त्यात तूप घाला आणि नंतर हे मिश्रण हातात घ्या आणि लाडू बनवायला सुरुवात करा. हे लाडू चवीबरोबरच पौष्टीकही आहेत. या लाडूत भरपूर पोषक घटक आहेत. बायोटिन, झिंक, ओमेगा-थ्री फॅटी एसिड आणि लोह आहेत. हे लाडू केसांना आतून मजबूत करतात, यामुळे पुरेशी आर्द्रता देतात. यापैकी एक लाडू दररोज खाऊ शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 10:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केस गळतीवर पौष्टिक उपचार, केस गळण्याचं प्रमाण होईल कमी, वाचा सविस्तर माहिती