Cholesterol : वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नैसर्गिक उपाय, औषधासारखं काम करतील या भाज्या, डॉक्टरांनी सांगितलं भाज्यांचं महत्त्व

Last Updated:

जास्त चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ आणि मसालेदार पदार्थ खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल हा एक चरबीयुक्त पदार्थ, आवश्यकतेपेक्षा जास्त वाढला तर तो रक्तवाहिन्यांत जमा होतो ज्यामुळे हृदयरोग वाढतो.

News18
News18
मुंबई : आपल्या खाण्यापिण्यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. निरोगी अन्न खाल्लं तर आरोग्य निरोगी राहतं, पण आपल्या आहारात चुकीचं अन्न खाल्लं तर आरोग्याचं तंत्र बिघडतं. जास्त चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ आणि मसालेदार पदार्थ खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल हा एक चरबीयुक्त पदार्थ, आवश्यकतेपेक्षा जास्त वाढला तर तो रक्तवाहिन्यांत जमा होतो ज्यामुळे हृदयरोग वाढतो.
advertisement
यासाठी, आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या आहारात समाविष्ट केल्या जाऊ शकतात. या देशी भाज्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधासारखं काम करतात.
advertisement
वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या
- पडवळ - ही भाजी कोलेस्ट्रॉल आहारात असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
- भेंडी - यातलं  फायबर कोलेस्ट्रॉलला चिकटून शरीराबाहेर टाकते.
- दुधी - दुधी यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि लिपिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
advertisement
- कारलं - चयापचय सुधारण्यासाठी कारलं फायदेशीर आहे.
- मेथी - मेथीच्या पानात फायबर असतं, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे.
- शेवग्याच्या शेंगा - या शेंगामधले अँटी-ऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या मजबूत करण्यास मदत करतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी घरगुती उपाय -
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कच्चा लसूण चांगला पर्याय आहे. कच्चा लसूण चघळल्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत होते.
advertisement
- बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. फायबरयुक्त पदार्थ, तसंच सफरचंद, पेरू आणि द्राक्षं, ओट्स देखील आहारात ठेवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol : वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नैसर्गिक उपाय, औषधासारखं काम करतील या भाज्या, डॉक्टरांनी सांगितलं भाज्यांचं महत्त्व
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement