Suraj Mishra: "तिच्यामुळे कर्जबाजारी झालो, तिला केव्हाच..."; मोनालिसाच्या लग्नाबद्दल दिग्दर्शक सनोज मिश्रा काय म्हणाले?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसलेला दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मोनालिसाने केलेल्या लग्नावर दिग्दर्शकांनी प्रतिक्रिया दिली असून तिच्यामुळे मी कर्जबाजारी झाल्याचेही ते म्हणाले.
महाकुंभामध्ये रूद्राक्षांच्या माळा विकताना व्हायरल झालेली मोनालिसा भोसले सध्या चर्चेत आली आहे. सनोज मिश्रा दिग्दर्शित, 'द डायरी ऑफ मणिपूर'मधून मोनालिसा अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. परंतु तिने चित्रपट रिलीजच्याच आधी केरळमधील एका मंदिरामध्ये प्रियकर फरमान खानसोबत लग्न केले आहे. मोनालिसाने केलेल्या लग्नामुळे दिग्दर्शक सनोज मिश्रा चिंतेत आहेत. त्यांनी तिच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे.
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सांगितले की, " मोनालिसा महाकुंभातून आल्यामुळे ती लव्ह जिहादची शिकार झालेली आहे. PFI नावाची संघटना आमच्या इथे काम करते. ती संघटना अनेक गोष्टींसाठी फंडिंग करते. त्यांचं काम आहे छोट्या शहरातल्या ज्या हिंदू मुली आहेत, ते त्यांचा पाठलाग करतात. फरमान सुद्धा PFI सोबत जोडलेला आहे. जर चौकशी केलीत तर ही गोष्ट सुद्धा आपल्या समोर येईल. समस्या अशी आहे की मोनालिसा आणि तिचे कुटुंब निर्दोष आहे, ते खूप साधे माणसं आहेत. त्यांच्यासोबत काय घडतंय हे त्यांना समजलंच नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मोनालिसालाही माझ्यापासून दूर केले. तिच्या कुटुंबालाही माझ्यापासून दूर ठेवण्यात आले, जेणेकरून ते त्यांचे काम सोप्प्या पद्धतीने करू शकतील. "
advertisement
तिच्या मुळे अनेक तरूणींचं करियर बरबाद होईल
"अनेक गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या. ती कुठे जातेय याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. मोनालिसाने ज्या चित्रपटात काम केले आहे, तो चित्रपट धर्मांतरणावर आधारित आहे. त्यामुळे मला टार्गेट केलं जातंय. मी त्या चित्रपटासाठी जेलमध्ये गेलो होतो, माझा अपमान झाला. माझ्यावर या चित्रपटासाठी साडे नऊ कोटींचं कर्ज आहे. त्याचं मी व्याज भरतोय. माझी 2 वर्शांची तपस्या धुळीला मिळाली. माझ्या चित्रपटाचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त एका चित्रपटाची शुटिंग बाकी आहे. पण मी आता केव्हाही मोनालिसासोबत काम करणार नाही. मला आता त्या गोष्टीसाठी लाज वाटतेय, ती अशिक्षित आहे. जंगलात राहणारी मुलगी आहे ती. मोनालिसाचं पाहून आता इतर मुलीही मुस्लिम तरूणासोबत लग्न करतील. "
advertisement
दिग्दर्शकाचे मोनालिसावर गंभीर आरोप...
सनोजने खुलासा केला की, त्यालाच माहिती नाही त्याचा चित्रपट केव्हा रिलीज होईल. "चित्रपटाचे सर्व काही काम संपले आहे. मला नाही वाटत की माझ्या चित्रपटासाठी मला कोणी डिस्ट्रिब्युटर मिळेल. हे आंतरधर्मीय विवाह चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जाणूनबुजून आयोजित केले गेलेले कटकारस्थान होते." सनोजने खुलासा केला की, त्याने मोनालिसाला अभिनयाचं प्रशिक्षण देण्यासाठी, तिला इंदौरहून ग्लॅमर जगात आणण्यासाठी, चित्रपट बनवण्यासाठी आणि तिच्यासाठी एकूण 9.50 कोटी रूपये खर्च केले आहेत. मोनालिसा कधीच कामाबद्दल गंभीर नव्हती. तिला कामावर आणण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. ती फक्त हसायची. मी तिच्यामुळे पूर्णपणे फसलो होतो, मी या गोष्टीमध्ये विचित्र पद्धतीने अडकलो होतो. मी काहीही करू शकत नव्हतो. तिच्यासाठी माझा कोणताही स्वार्थी हेतू नव्हता. मी फक्त पैसे खर्च करत होतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 5:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Mishra: "तिच्यामुळे कर्जबाजारी झालो, तिला केव्हाच..."; मोनालिसाच्या लग्नाबद्दल दिग्दर्शक सनोज मिश्रा काय म्हणाले?







