advertisement

Buldhana: मंदीत संधी! हॉस्पिटलमधून चक्क सिलेंडरची केली चोरी, बुलडाण्यातील घटना

Last Updated:

17 सिलेंडरपैकी एक भरलेले सिलेंडर आणि इतर साहित्य चोरी झाल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आहे. चोरट्यांनी सिलेंडरची चोरी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे 

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा: इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे जगभरात इंधनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भारतात आता एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरांमध्ये एलपीजी सिलेंडर मिळत नसल्यामुळे व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आहे. सिलेंडर घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सिलेंडर मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे, अशातच आताच चक्क सिलेंडर चोरीची घटना बुलडाण्यात घडली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या टीबी हॉस्पिटलमधील स्वयंपाक घरातून भरलेल्या गॅस सिलेंडरसह इतर साहित्याची चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरांनी स्वयंपाक घरात घुसून भरलेला सिलेंडर घेऊन पळ काढला आहे.
संपूर्ण देशभरात गॅस तुटवड्यामुळे मोठी तारांबळ उडाली असून बुलढाण्यातील टीबी हॉस्पिटलमधील स्वयंपाक घराची खिडकी आणि दरवाज्याचा कडी कोंडा तोडून 17 सिलेंडरपैकी एक भरलेले सिलेंडर आणि इतर साहित्य चोरी झाल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आहे. चोरट्यांनी सिलेंडरची चोरी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
advertisement
हे भामटे एवढ्यावरच थांबले नाहीतर, तांब्याची ऑक्सिजनची पाईपलाईन देखील काढून देण्यात आली आहे. एकूण दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 घरपोच गॅस सेवा बंद; बीडमध्ये ग्राहकांची एजन्सीबाहेर गर्दी
दरम्यान, बीडमध्ये गॅस एजन्सींच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अमेरिका-इस्त्रायलने इराणवर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट बीड जिल्ह्यातील नागरिकांवर दिसू लागला आहे. प्रशासन घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असताना वास्तव मात्र वेगळंच चित्र बघायला मिळत आहे. गॅस एजन्सीकडून घरपोच डिलिव्हरी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही सतत बंद येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. घरगुती गॅस सुरळीत आहे.. या दाव्याचा फुगा फुटला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बंद पडलेले नंबर तात्काळ सुरू करावेत आणि घरपोच सेवा पुन्हा सुरू करावी, अशी तीव्र मागणी आता नागरिकारांकडून केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana: मंदीत संधी! हॉस्पिटलमधून चक्क सिलेंडरची केली चोरी, बुलडाण्यातील घटना
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement