पुणे पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, टेलिग्रामवरून 600 रुपयांत सौदा; कसा लुटायचा विद्यार्थ्यांना?
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पेपर फोडल्याचा बनाव करून टेलिग्रामच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चै
पुणे : राज्यभरात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार सुरू असल्याचं उघडकीस येत आहे. दरम्यान पुणे पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. पेपर फोडल्याचा बनाव करून टेलिग्रामच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चैतन्य शेंडे (रा. चंद्रपूर) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो स्वतः नर्सिंगचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार माहिती अशी की, चैतन्य शेंडे याने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये एकूण 245 विद्यार्थी सामील झाले होते. आगामी गणित विषयाचा पेपर आपल्याकडे असल्याचा दावा करत तो या ग्रुपमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा. पेपर देण्यासाठी त्याने प्रत्येकी 600 रुपये अशी किंमत ठेवली होती. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून तो त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारायचा.
advertisement
पैसे मिळताच 'ब्लॉक'चा पवित्रा
चैतन्यची मोडस ऑपरेंडी अत्यंत चलाखीची होती. एखादा विद्यार्थी ६०० रुपये भरून पेपरची मागणी करायचा, तेव्हा त्याला पेपर देण्याऐवजी चैतन्य त्याला ग्रुपमधून आणि वैयक्तिक चॅटवरून तत्काळ ब्लॉक करून टाकायचा. अशा प्रकारे त्याने शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या तणावाखाली असलेले विद्यार्थी पेपर मिळवण्याच्या नादात या जाळ्यात अडकले आणि आपली आर्थिक लूट करून बसले.
advertisement
नर्सिंगचा विद्यार्थी निघाला मास्टरमाईंड
पोलीस तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी चैतन्य शेंडे हा स्वतः नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या या विद्यार्थ्याने गुन्हेगारीचा मार्ग का निवडला, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये चैतन्यला आणखी कुणाची मदत लाभली आहे का? तसेच इतर कोणत्याही विषयाचे पेपर त्याने अशा प्रकारे विकले आहेत का? याचा सखोल तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे.
advertisement
पेपर फुटल्याचा दावा खोटा
पैसे उकळण्यासाठीचा हा प्रकार आहे. पेपर अजिबात फुटलेला नाही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आम्ही गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 5:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, टेलिग्रामवरून 600 रुपयांत सौदा; कसा लुटायचा विद्यार्थ्यांना?









