पैसे देत नाहीत ना, कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्त करा; कोर्टाच्या आदेशाने धाराशिवमध्ये गोंधळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उमरगा येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी संपादित केलेल्या ११ एकर जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कारवाई करत नसल्याने फिर्यादी पुन्हा न्यायालयात गेले होते.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांची खुर्ची जप्त करा, असे आदेश जिल्हा न्यायालयाने दिल्याने धाराशिवमध्ये गोंधळ उडाला आहे. उमरगा येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी संपादित केलेल्या ११ एकर जमिनीचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाने जिल्हाधिकारी पुजार यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले.
उमरगा येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी संपादित केलेल्या ११ एकर जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कारवाई करत नसल्याने फिर्यादी पुन्हा न्यायालयात गेले होते. त्यावर संतापून न्यायालयाने जिल्हाधिकारी पुजार यांची खुर्ची, टेबल, एसी जप्त करा असे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा वकील आणि कर्मचाऱ्यांचा आरोप
खुर्चीवर जप्तीसाठी वकील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळ सुरू आहे. खुर्ची जप्तीची नोटीस घेऊन आलेले वकील आणि कर्मचाऱ्यांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धट वर्तन केले.
advertisement
कोर्टाच्या आदेशावर जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप, वकील संघटनांचा आरोप
माझी खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालय कसे देते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्याचा आरोप वकील संघटनेने केला आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभागाला मार्चपर्यंत पैसे देण्यास सांगतो, अशी भूमिका जिल्हाधिकारी पुजार यांनी मांडली. दुसरीकडे खुर्ची जप्त करण्यावर वकील आणि कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळ सुरू आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पैसे देत नाहीत ना, कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्त करा; कोर्टाच्या आदेशाने धाराशिवमध्ये गोंधळ








