काम शिरसाटांच्या विभागाचं, कोंडी सरनाईकांची, आंदोलकांनी रस्ता अडवला, धाराशिवमध्ये राडा

Last Updated:

Kunbi Caste Validity Issue: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशानंतर ज्यांच्याकडे विहित पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.

प्रताप सरनाईक (मंत्री)
प्रताप सरनाईक (मंत्री)
बालाजी निरफळ, धाराशिव : मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.
या संतापाचा उद्रेक होऊन धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला.
धाराशिवमध्ये रेस्ट हाऊसच्या बाहेरच मंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालून आमचे प्रश्न सोडवा मगच रेस्ट हाऊसमध्ये जा, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. जवळपास १०-१५ मिनिटे आंदोलकांनी पालकमंत्र्याचा रस्ता अडवून धरला होता.

नेमकी घटना काय?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशानंतर ज्यांच्याकडे विहित पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. मात्र कागदपत्रे सादर करूनही सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागाअंतर्गत वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते.
advertisement
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता होताच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी आपल्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक खूपच आक्रमक झाले होते. शिरसाट यांच्या विभागाच्या प्रश्नांसाठी सरनाईक यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रताप सरनाईक यांनी समितीच्या सदस्यांना फोन लावून विचारणा केली. मात्र आंदोलक मंत्री महोदयांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काम शिरसाटांच्या विभागाचं, कोंडी सरनाईकांची, आंदोलकांनी रस्ता अडवला, धाराशिवमध्ये राडा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement