Dharashiv Crime : 'पोरीचा नंबर दे' म्हणत टोळक्याची विद्यार्थ्याला हंटरने बेदम मारहाण, Video काढला अन्...
- Published by:Saurabh Talekar
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
Dharashiv Crime News : मारहाण झालेला विद्यार्थी आणि मारहाण करणारे तरुण हे दोघेही मुरूम येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केसरजवळगा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भूसणीवाडी येथील काही तरुणांनी अमानुषपणे हंटरने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गावातील एका मुलीशी ओळख करून देण्यास किंवा तिला फोन लावून देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोरीची ओळख करून दे
मारहाण झालेला विद्यार्थी आणि मारहाण करणारे तरुण हे दोघेही मुरूम येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सुमारे आठ दिवसांपूर्वी घडली असल्याचं समजतंय. काही पोरांनी तरुणाला पोरीची ओळख करून दे, असं म्हटलं अन् वाद सुरू झाला. तरुणाला फोन लावून देण्याची धमकी देण्यात आली होती.
advertisement
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेबाबत मुरूम पोलीस स्टेशनच्या पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्हीकडील मुलांना व्हिडिओच्या आधारे बोलावण्यात आले होते. मात्र, कोणीही तक्रार दाखल केली नाही आणि हे प्रकरण त्यांनी आपापसात मिटवले असल्याने मुलांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी असेही स्पष्ट केले आहे की, जर या प्रकरणी कोणी तक्रार दाखल केली, तर निश्चितपणे गुन्हा दाखल केला जाईल. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv Crime : 'पोरीचा नंबर दे' म्हणत टोळक्याची विद्यार्थ्याला हंटरने बेदम मारहाण, Video काढला अन्...