धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा, चाकू, हंटर अन् कड्याने एकमेकांना मारहाण, VIDEO व्हायरल

Last Updated:

Crime in Dharashiv : धाराशिवच्या उमरगा तालुक्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील मारहाण केल्याच्या विविध घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात एका सरपंचाला मारहाण करण्यात आली होती. एका टोळीने सरपंचाची कार अडवून त्यांना मारहाण केली. तसेच पेट्रोल ओतून कार जाळण्याचा प्रयत्नही केला. ही घटना ताजी असताना आता धाराशिवच्या उमरग्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.
आरोपींनी चाकू, हंटर आणि हातातील कड्याने एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या हाणामारीत एका तरुणाचा कान फाटला आहे. तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुरुम पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उमरगा तालुक्यातील येगेनूर गावात घडली आहे. इथे काही तरुण वेगानं गाडी चालवत होते. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना गाडी सावकाश चालवा, असं म्हटलं. यावरून दोन गटात बाचाबाची झाली. पण पुढच्याच क्षणात हा वाद विकोपाला गेला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं. तरुणांनी चाकू, हंटर आणि हातातील कड्याने एकमेकांना मारहाण केली आहे.
advertisement
या मारहाणीत एका तरुणाचा तरुणाचा कान फाटला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दोन गटातील तुफान हाणामारीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुरूम पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा, चाकू, हंटर अन् कड्याने एकमेकांना मारहाण, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement