Kidnapping: विद्यार्थीनीवर जडला जीव, ज्याची घेतली मदत त्याचंच केलं अपहरण! सिल्लोडमध्ये अ‍ॅकॅडमी संचालकाचा कांड उघड

Last Updated:

Kidnapping: पोलिसांनी चार आरोपीना फिल्मी स्टाईलने अटक करून कोर्टात सादर केलं. ही घटना सिल्लोड येथील केळगाव घाटात घडली.

Kidnapping: विद्यार्थीनीवर जडला जीव, ज्याची घेतली मदत त्याचंच केलं अपहरण! सिल्लोडमध्ये अ‍ॅकॅडमी संचालकाचा कांड उघड
Kidnapping: विद्यार्थीनीवर जडला जीव, ज्याची घेतली मदत त्याचंच केलं अपहरण! सिल्लोडमध्ये अ‍ॅकॅडमी संचालकाचा कांड उघड
छत्रपती संभाजीनगर : पोलीस भरती अ‍ॅकॅडमीच्या संचालकाने एका विद्यार्थ्यांचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सिल्लोडमध्ये घडली आहे. विद्यार्थीनीशी असलेलं प्रेमप्रकरण उघड होऊ नये, या भीतीने संचालकाने हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. ही घटना सिल्लोड येथील केळगाव घाटात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपीना फिल्मी स्टाईलने अटक करून कोर्टात सादर केलं आहे.
‎हिंदवी करिअर अ‍ॅकॅडमीचा संचालक दशरथ विठ्ठल जाधव (सिल्लोड), आरोपीचा मित्र गणेश कृष्णा जगताप (रा.वडोद चाथा), प्रशिक्षणार्थी गणेश सोनूसिंग चव्हाण (रा. कोहळा तांडा), प्रशिक्षणार्थी प्रवीण लालचंद राठोड (रा. कोहळातांडा) अशी अपहरण करणाऱ्यांची नावं आहेत. तर अमोल गजानन मख, असं अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगाव येथील 20 वर्षांचा अमोल मख हा हिंदवी अ‍ॅकॅडमीमध्ये वर्षभरापासून पोलीस भरतीची तयारी करतो. याच दरम्यान अमोलची संचालक जाधव सोबत ओळख झाली. जाधवचं अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर प्रेम होतं. तिच्याशी ओळख वाढवण्यासाठी संचालकाने अमोलची मदत घेतली. मात्र, काही दिवसांनी संचालक आणि अमोलमध्ये वाद झाल्याने त्याने अमोलचा प्रवेश रद्द केला. संचालक आणि संबंधित विद्यार्थिनीचे काही व्हॉइस रेकॉर्डिंग अमोलच्या मोबाईलमध्ये होते. अमोल हे पुरावे व्हायरल करून आपलं प्रेम प्रकरण बाहेर आणेल, अशी भीती संचालक जाधवला वाटली.
advertisement
‎संचालक जाधवने अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना केळगाव येथे पाठवले. ती दोन मुलं अमोलला घाटात घेऊन आले. तिथे अगोदरच घेऊन बसलेला संचालक आणि त्यांच्या मित्राने अमोलला जबर मारहाण करत पुराव्यांची मागणी केली. अमोलने पुरावे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी अमोलला एम एच 48 ए 9918 चार चाकीमध्ये बसून त्याचं अपहरण केलं. हा संपूर्ण प्रकार अमोलच्या ओळखीच्या व्यक्तीने बघितला. त्याने तात्काळ सिल्लोड पोलिसांना याबाबत माहिती दिली.
advertisement
‎पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला आणि आरोपींना भराडीजवळ अटक केली. आरोपींना सिल्लोड कोर्टात हजर केलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक लहू घोडे, कर्मचारी विश्वनाथ तायडे, यतीन कुलकर्णी, विठ्ठल नागरगोत, रामेश्वर जाधव, रमेश व्यवहारे, अनंत जोशी यांनी या प्रकरणाचा तपास केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kidnapping: विद्यार्थीनीवर जडला जीव, ज्याची घेतली मदत त्याचंच केलं अपहरण! सिल्लोडमध्ये अ‍ॅकॅडमी संचालकाचा कांड उघड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement