Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवलीचं राजकारण बदलणार, 'या' ऑफरमुळे ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या वाटेवर?

Last Updated:

Kalyan Dombivli Local Body Election: कल्याण-डोंबिवलीचे राजकारण बदलणार आहे. रविंद्र चव्हाण यांनी टाकलेल्या डावामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

कल्याण-डोंबिवलीचं राजकारण बदलणार, 'या' ऑफरमुळे ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या वाटेवर?
कल्याण-डोंबिवलीचं राजकारण बदलणार, 'या' ऑफरमुळे ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या वाटेवर?
कल्याण-डोंबिवली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंग सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणात यात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे कल्याण-डोंबिवलीचे राजकारण बदलणार आहे. रविंद्र चव्हाण यांनी टाकलेल्या डावामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. मात्र वर्षभरापूर्वी ठाकरेंकडे आलेल्या नेत्याला भाजपने मोठी ऑफर दिल्यानेच पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे उद्धवसेनेला मोठा धक्का बसला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपची ताकद वाढणार आहे.
म्हात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतल्याची माहिती बाहेर आली होती. त्या भेटीनंतर ते शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली होती. मात्र, अखेरीस म्हात्रे यांनी भाजपचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
म्हात्रे यांनी यापूर्वी ठाकरे गटाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली होती. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे आव्हान परतवून लावले होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून भाजपने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हात्रे यांना पक्षात आणण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

भाजपात प्रवेश पण अट काय?

दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटात पुन्हा पक्ष प्रवेशासाठी चाचपणी केल्याची चर्चा आहे. मात्र, आता आज भाजपात प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. त्याशिवाय, त्यांच्या मातोश्रीदेखील नगरसेविका होत्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असून भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गट-मनसे हे दोघे जण युतीत लढण्याची चिन्हे आहेत. अशातच दीपेश म्हात्रे यांना भाजप प्रवेशाच्या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर पद आणि आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा सध्या कल्याण-डोंबिवलीत सुरू आहे.
advertisement

दीपेश म्हात्रे यांची हकालपट्टी...

भाजपमध्ये आज प्रवेश करणारे दीपेश म्हात्रे यांची शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पद आणि ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे. तशी माहिती ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनातून जाहीर करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivli News: कल्याण-डोंबिवलीचं राजकारण बदलणार, 'या' ऑफरमुळे ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या वाटेवर?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement