Upwaas Recipe: उपवासाला तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? एक कप साबुदाण्यापासून बनवा पौष्टिक रेसिपी

Last Updated:

Upwaas Recipe: सणासुदीसाठी आणि उपवासासाठी खास गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी फार लोकप्रिय आहे.

+
Upwaas

Upwaas Recipe: उपवासाला तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? एक कप साबुदाण्यापासून बनवा पौष्टिक रेसिपी

मुंबई: भारतात सण-उत्सवांना फक्त धार्मिक महत्त्व नसून ते चविष्ट आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीशीही जोडलेले असतात. सणाच्या दिवशी घराघरात गोडधोडाचा वास दरवळतो. त्यातही जर उपवासाचा दिवस असेल तर साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थ असलेल्या साबुदाणा खीरीचाही समावेश होतो.
शरद ऋतूच्या सुरुवातीला नवरात्र, एकादशी आणि इतर उपवासांच्या पार्श्वभूमीवर या खिरीला विशेष महत्व आहे. वयोवृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सगळ्यांचं मन तृप्त करणारा हा सोपा गोड पदार्थ शरीराला उर्जा देखील देतो. साबुदाना खीर कशी करायची, याची सोपी रेसिपी या ठिकाणी देण्यात आली आहे.
advertisement
साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
साबुदाणा (भिजवलेला ) - 1 कप
दूध - 1 ग्लास
साखर - अर्धी वाटी (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
वेलची पूड - 1/2 चमचा
केशर (ऐच्छिक)
बदाम, काजू, पिस्ता - 2 टेबलस्पून (बारीक चिरलेले)
तूप - 1 टेबलस्पून
साबुदाणा खीर बनवण्या कृती: सर्वात अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि अर्ध्या तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळून ठेवा. एका पातेल्यात तूप टाक त्यात सगळे ड्रायफ्रुट्स लालसर होईपर्यंत परतून घ्या. ते लालसर झाल्यानंतर बाहेर काढा. त्याच पातेल्यात वेलची पुड टाकून पाणी टाका आणि 2 मिनिट उकळून घ्या. उकळेल्या पाण्यात भिजवलेला साबुदाणा टाका. साबुदाना थोडा शिजल्यानंतर त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण नीट ढवळत राहा. नंतर त्यात दूध ओता आणि ड्रायफ्रुट्स टाका. खिरीला पुन्हा एक उकळी काढून घ्या. जर तुमच्याकडे केशर असेल तर ते वरून टाका. साबुदाणा खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते. सणासुदीच्या आणि उपवासाच्या काळात खास गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी फार लोकप्रिय आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Upwaas Recipe: उपवासाला तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? एक कप साबुदाण्यापासून बनवा पौष्टिक रेसिपी
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement