शिवसेनेच्या सर्व मंत्री-आमदारांचा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Eknath Shinde: नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई: मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे आणि करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक घरे माती चिखलाने भरून गेली आहेत. तसेच शेतीचे संपूर्ण नुकसान झाले असून शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे. आज येथील ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली तसेच शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून त्यांना आश्वस्त केले.
advertisement
शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी
शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधी द्या. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या आमदार-मंत्र्यांचा पगार शेतकऱ्यांसाठी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभे राहणे गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.
advertisement
अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेनेच्या सर्व मंत्री-आमदारांचा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय