Agriculture News: देवा नको अंत पाहू..;सोन्यासारखं पिक पाण्यात वाहून गेलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबल्याने शेतातील सर्व डाळिंबाची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेताला नदीचे स्वरूप मिळाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पैठण तालुका हा दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असतो. आता मात्र मुसळधार पावसाने पैठणमध्ये थैमान घातले आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतातील उभे असलेले कापूस, मूग, बाजरी, भुईमूग ही पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे पिवळी पडू लागली तर काही ठिकाणी पिके वाहून गेली. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.
पैठणच्या दादेगाव हजारे शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबल्याने शेतातील सर्व डाळिंबाची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेताला नदीचे स्वरूप मिळाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापसाचे बोंडे अक्षरशः काळे पडले असून मोसंबी, डाळिंब फळबाग देखील पाण्यात गेल्या असून या फळबागांचा लावलेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
advertisement
मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे चांगतपुरी गावातील मुख्य बाजारपेठ आणि परिसरातील 20 ते 25 घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य आणि दुकानांतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 10 ते 12 तासांनी पाणी ओसरले.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 24, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News: देवा नको अंत पाहू..;सोन्यासारखं पिक पाण्यात वाहून गेलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO