BMC Election Shiv Sena BJP: बीएमसीच्या निवडणुकीच्या रणांगणात शिंदेंची १२५ जागांची मागणी; भाजपकडून मात्र धक्का देणारी ऑफर!

Last Updated:

BMC Election Eknath Shinde BJP : २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १५० जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प भाजपने केला आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने थेट १२५ जागांची मागणी केली आहे.

बीएमसीच्या निवडणुकीच्या रणांगणात शिंदेंची १२५ जागांची मागणी; भाजपकडून मात्र धक्का देणारी ऑफर!
बीएमसीच्या निवडणुकीच्या रणांगणात शिंदेंची १२५ जागांची मागणी; भाजपकडून मात्र धक्का देणारी ऑफर!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. राज्यातील महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे आता जागा वाटपाच्या मुद्यावरून तणातणी होण्याची चिन्हे आहेत. २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १५० जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प भाजपने केला आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने थेट १२५ जागांची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांनी आपल्या तयारीला वेग दिला आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत तब्बल १०० ते १२५ वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. परंतु भाजपकडून या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना (शिंदे) गटासाठी ही बीएमसी निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेना फुटल्यानंतर ही त्यांची पहिलीच महानगरपालिका लढाई असेल. फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडील मागील टर्ममधील ४६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि इतर पक्षांतील काही माजी नगरसेवक व नेतेही शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिंदे गटाकडे मुंबईतील जवळपास १२५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी किमान इतक्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement

भाजपकडून किती जागांची ऑफर?

यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा पाडाव करून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मुंबईच्या महापौरपदी आपलाच नगरसेवक बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने २२७ जागा स्वबळावर लढल्यास १५० जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प सोडला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने १०० ते १२५ जागांची मागणी केली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला केवळ ७० जागा देण्यास तयार आहे. शिंदेना १०० जागा सोडता येणार नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे शिंदे गटाने एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “१०० प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणे हा आमचा ठरलेला निर्णय आहे. आमच्याकडे पुरेसे नेतृत्व, पुरेसे कार्यकर्ते आणि मजबूत संघटनात्मक ताकद आहे.”
advertisement
बीएमसी निवडणुकीत महायुतीचे समीकरण कसे बसते, भाजप किती जागा सोडतो आणि शिंदे गट किती कणखर भूमिका घेतो, यावर या निवडणुकीचे राजकीय चित्र ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Shiv Sena BJP: बीएमसीच्या निवडणुकीच्या रणांगणात शिंदेंची १२५ जागांची मागणी; भाजपकडून मात्र धक्का देणारी ऑफर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement