advertisement

उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला, एकनाथ शिंदेंनी गुडबाय कसं केलं? म्हणाले....

Last Updated:

विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला.

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे
मुंबई : जवळपास २५ वर्षे एकमेकांचे जीवलग सहकारी असे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाते होते. परंतु २०२२ साली ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करून गेली चार वर्षे एकनाथ शिंदे यांनी दखलपात्र राजकारण केले. या दरम्यान ठाकरे कुटुंबासोबत संघर्षाचे प्रसंगही आले. परंतु ठाकरेंविषयीचा मनातील ओलावा एकनाथ शिंदे यांनी शक्य तेवढ्या वेळा जपला. आजही उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या निरोपावेळी शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचा उल्लेख साहेब असा केला.
विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), दादाराव केचे (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप) आणि संजय केनेकर (भाजप) या ९ आमदारांची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपली. या सदस्यांच्या भावी आयुष्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. विशेष करून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिंदे काय बोलतात, याकडे अनेकांचे लक्ष होते.
advertisement

एकनाथ शिंदेंनी गुडबाय कसं केलं?

एकनाथ शिंदे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या सभागृहातून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीही एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा 'साहेब' असा विशेष उल्लेख केला.
advertisement

एकनाथ शिंदे यांची चारोळी, उद्धव ठाकरेंकडून नमस्कार

निरोप देताना कुणाबद्दलही वाईट बोलायचे नसते. कोणत्या ना कोणत्या कारणाने सगळ्यांची भेट होणारच आहे. ओ जानो वालो हो सके तो लौटके आणा, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी चारोळी म्हटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला.

एकनाथ शिंदे यांच्याकडून सदस्यांना खास शुभेच्छा

advertisement
राजेश राठोड- राजेश राठोड यांच्या सारख्या विरोधकांमध्ये आवश्यकता असते. राजेश राठोड यांनी जनतेच्या हितासाठी त्यांच्या कार्यकाळात काम केले.
संदीप जोशी- संदीप जोशी नागपूर महापौर राहिले आहेत. त्यांनी मागे राजकारणातून निवृत्त घेतली होती. आता पुन्हा त्यांनी निर्णयाचा फेरविचार करून सहा महिन्याचा ब्रेक घेण्याचे ठरवले.
दादाराव केचे- दादाराव साधेपणा हीच तुमची ओळख आहे. तुमची सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे. तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा तुमचा प्रयत्न असतो, दादाराव तुम्हाला खास शुभेच्छा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला, एकनाथ शिंदेंनी गुडबाय कसं केलं? म्हणाले....
Next Article
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश; महिन्याच्या Rechargeमध्ये मिळणार इतके दिवस
  • मोबाइल रिचार्जच्या 'लफड्या'वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

  • महिनाभराच्या रिचार्जमध्ये मिळणार इतके दिवस

  • नवे नियम वाचा

View All
advertisement