advertisement

Vishnu Name List: महाविष्णुंच्या पापनाशक नावांची यादी; नृसिंह माहात्म्य पुस्तकात उल्लेख; मुलांसाठी आधुनिक आणि अर्थपूर्ण

Last Updated:

Vishnu Name List: श्री नृसिंह माहात्म्य या ग्रंथातील 25 व्या पानावर महादेवांनी उच्चारलेल्या भगवान विष्णूंच्या काही अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण नावांचा उल्लेख आहे. याबाबत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. हिंदू धर्मात या नावांचे महत्त्व विशेष आहे.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात श्री हरी महाविष्णू हे विश्वाचे पालनकर्ते, त्यांच्याशिवाय या सृष्टीचे पानही हालत नाही असे मानले जाते. सर्व प्राणीमात्रांचा पोशिंदा असा त्यांचा उल्लेख करतात. त्यांच्या अनंत गुणांचे वर्णन विविध पुराणांमध्ये आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आढळते. श्री नृसिंह माहात्म्य या ग्रंथातील 25 व्या पानावर महादेवांनी उच्चारलेल्या भगवान विष्णूंच्या काही अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण नावांचा उल्लेख आहे. याबाबत राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. हिंदू धर्मात या नावांचे महत्त्व विशेष आहे.
या ग्रंथात विष्णू, वासुदेव, नारायण, पुरुषोत्तम, गोविंद यांसारखी प्रचलित नावे तर आहेतच, पण त्यासोबतच काही विशेष नामेही आढळतात. म्हणजे. यज्ञाचे रक्षण करणारे यज्ञपालक, तेजस्वी असणारे आयुष्मान्, वज्रासारखी तीक्ष्ण दाढे असलेले वज्रदंष्ट्र आणि शांतीची वृद्धी करणारे शांतिवर्धन. महादेवांनी ही नामे स्वतः उच्चारली असल्याने त्यांना विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
सध्याच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांसाठी अशा नावांच्या शोधात असतात, जी अर्थपूर्ण, सांस्कृतिक वारसा जपणारी आणि कानाला ऐकायला गोड वाटतील. या पार्श्वभूमीवर, श्री नृसिंह माहात्म्यातील ही नावे मुलांच्या नामकरणासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
advertisement
पारंपारिक नावांना पसंती देणाऱ्यांसाठी: विष्णू, वासुदेव, नारायण, गोविंद, मधुसूदन.
वेगळ्या धाटणीच्या नावांच्या शोधात असलेल्यांसाठी: विभू, प्रभवविष्णू, हंस, सत्यकीर्ती, पुष्कल, महावीर, प्रेरक.
वीरश्रीयुक्त नावे: शत्रूघ्न, शत्रूतापन, शंखी, चक्री, गदी.
advertisement
एकादशीच्या दिवशी पूजा करताना या नावांचा जप करणे शुभफळदायी मानले जाते. एकादशीची पूजा व्रत उपवास श्रेष्ठ मानले जातात. महाविष्णूच्या या नावांचे फक्त नामकरणच नव्हे, तर नियमित पठण केल्याने जीवनातील पाप नष्ट होऊन मोक्षाचा मार्ग सुकर होतो. ही नावे शुभ ऊर्जेने भरलेली असून नवीन पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे, आपल्या मुलाचे नाव ठेवताना या दिव्य नावांचा विचार करणे निश्चितच फलदायी ठरेल. या नावांमधून महाविष्णूचा उच्चार आपल्या नावातून होत राहील.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vishnu Name List: महाविष्णुंच्या पापनाशक नावांची यादी; नृसिंह माहात्म्य पुस्तकात उल्लेख; मुलांसाठी आधुनिक आणि अर्थपूर्ण
Next Article
Gold आता नाही खरेदी केलं तर पश्चात्ताप होईल, 10 ग्रॅम सोन्याचे टार्गेट थेट 9 लाख रुपये; सर्वात मोठी भविष्यवाणी
Gold आता नाही खरेदी केलं तर पश्चात्ताप होईल, 10 ग्रॅम सोन्याचे टार्गेट थेट 9 लाख रुपये
  • सोनं झालंय स्वस्त, पण पुढचं चित्र भयंकर!

  • सध्याची घसरण हीच सर्वात मोठी संधी

  • 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे

View All
advertisement