advertisement

'अपना डीलर पाकिस्तान में, घरात 19 कोटींचा चेक', संभाजीनगरच्या तोतया IAS महिलेच्या फोनमध्ये खळबळजनक खुलासे

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला होता.

News18
News18
छत्रपती संभाजीनगरच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला होता. आता या महिलेबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहे. संबंधित महिलेचं पाकिस्तानी आणि अफगाणिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. शिवाय तिच्या घरात तब्बल १९ कोटींचा चेकही सापडला आहे. त्यामुळे ही महिला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
कल्पना त्र्यंबकराव भागवत असं या महिलेचं नाव असून ती IAS अधिकारी असल्याचं भासवून मागील ६ महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती. आता या महिलेचं प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग, तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले. तिच्या घराच्या झडतीत १९ कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रे तसेच परदेशी नंबरशी नियमित संपर्क अशा अनेक गोष्टी समोर आल्या.
advertisement
त्यामुळे ही महिला भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का? असा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित महिलेला बुधवारी न्यायलयात हजर केलं असता कोर्टाने तिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढच्या दहा दिवसांत महिलेकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

तपासात नक्की काय काय सापडलं?

advertisement
पोलीस तपासांत संबंधित महिलेचं पडेगाव परिसरात घर असल्याचं समोर आलं आहे. तसेच तिचा प्रियकर अफगाणिस्तानचा असल्याचेही निदर्शनास आलं आहे. तिच्या फोनमध्ये पोलिसांना पाकिस्तान, पेशावर आर्मी, अफगाण अॅम्बेसी व ११ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले आहेत. एका चॅटमध्ये 'अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?' असा उल्लेखही आढळून आला आहे. अफगाणी प्रियकर अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालिब यमाशी ती व्हॉट्सअॅप कॉलवरून संपर्कात होती.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे घरझडतीतून पोलिसांना १९ कोटींचा चेक सापडला आहे. त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीचे नाव दिले असून त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत अशी नावे असल्याची माहिती समोर आली आहे. ६ लाखांचा दुसरा चेकही महिलेच्या घरात आढळला आहे. तसेच तिच्या खात्यातून ३२.६८ लाखांचे व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याशिवाय दिल्लीत स्फोट घडायच्या काळात संबंधित महिलेनं दिल्ली, मणिपूर, उदयपूर, जोधपूरचा वारंवार विमानप्रवास केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अपना डीलर पाकिस्तान में, घरात 19 कोटींचा चेक', संभाजीनगरच्या तोतया IAS महिलेच्या फोनमध्ये खळबळजनक खुलासे
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement