शरिरावर असंख्य वार, घाटात फेकला मृतदेह; 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचा निर्घृण खून, छ.संभाजीनगर हादरलं

Last Updated:

तुकाराम गव्हाणे यांचं शनिवारी रात्री आठ वाजता अपहरण करण्यात आलं होतं. ही घडना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उंडणगाव- बोदवड रस्त्यावर घडली.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे.  पोलीस, नागरिकांना सांगितले म्हणून मारहाण करत शेतकऱ्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी  पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील बोदवड इथं ही घटना घडली आहे. तुकाराम गव्हाणे असं या उद्योजक शेतकऱ्याचं नाव आहे.  तुकाराम गव्हाणे यांचं शनिवारी रात्री आठ वाजता अपहरण करण्यात आलं होतं. ही घडना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उंडणगाव- बोदवड रस्त्यावर घडली. तुकाराम माधवराव गव्हाणे हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता एका व्यापाऱ्याला दिलेल्या मक्याचे पैसे आणण्यास उंडणगाव येथे गेले होते. त्यांनी व्यापाऱ्यांकडून काही पैसे घेतले आणि रात्री ८ वाजता दुचाकीने बोदवड येथील घराकडे जात असताना रस्त्यात अज्ञात लोकांनी त्यांचं अपहरण केलं. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या मुलाने शोधाशोध सुरू केली. परंतु, शोध न लागल्याने रात्री उशिरा मुलाने अजिंठा ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
advertisement
'एक कोटी घेऊन ये तुझ्या वडिलाला सोडू'
अपहरणकर्त्यांनी रात्री बारा वाजता फोन करून शेतकऱ्याच्या मुलाला एक कोटी रुपयांची मागणी केली.  'एक कोटी घेऊन ये तुझ्या वडिलाला सोडू' असा फोन वडिलांच्याच फोन मुलाला आला.  घाबरलेल्या अवस्थेत मुलगा संभाजीनगरला रात्री पैसे देण्यासाठी सुद्धा आला. पण मुलाला तुकाराम गव्हाणे हे कुठेही सापडले नाही. या भीतीतून पोलिसात तक्रार दिली होती, तर गावातील नागरिकांना या सगळ्या गोष्टीची भनक लागल्याने नातेवाईक आणि आजूबाजूच्या गावांमध्ये देखील या बातमीचा प्रसार झाला. अपहरणकर्त्यापर्यंत या घटना पोहोचल्या त्याचा राग धरत पाच अपहरणकर्त्यांनी उद्योजक शेतकरी तुकाराम गव्हाणे यांचा जीव घेतला.
advertisement
चाळीसगाव कन्नड घाटात गव्हाणेंचा खून
पोलिसात तक्रार दिल्याचा राग आणि नागरिकांना सांगितल्याचा राग आरोपींना आला आणि त्यातून त्यांनी चाळीसगाव कन्नड घाटात उद्योजक शेतकऱ्याचा जीव घेतला.चाळीसगाव कन्नड घाटामध्ये तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेहावर असंख्य वार असलेल्या अवस्थेत घाटात त्यांचा मृतदेह सापडला.
मारेकऱ्यांमध्ये नातेवाईकाचा समावेश
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि वेगाने सूत्र फिरवली.  याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, आरोपी मृत शेतकऱ्याच्या गावाजवळीलच असलेल्या गावातील आहे.  यामध्ये दोन जण मृत तुकाराम गव्हाणे यांचे नातेवाईक आहे. घटना घडल्या बरोबरच पोलिसांना कल्पना झाल्यानंतरही पोलीस शेतकऱ्याला वाचवू शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरिरावर असंख्य वार, घाटात फेकला मृतदेह; 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचा निर्घृण खून, छ.संभाजीनगर हादरलं
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement