'त्याला वाटतंय धुरंधर त्याच्यामुळे चालला', Drishyam 3 च्या निर्मात्यांचं अक्षय खन्नाला ओपन चॅलेंज, शोधली तगडी रिप्लेसमेंट

Last Updated:
Drishyam 3 Controversy: गाजलेल्या 'दृश्यम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागातून अक्षय खन्नाने घेतलेल्या एक्झिटमुळे निर्माते इतके भडकले आहेत की त्यांनी अक्षयवर 'यशाची हवा डोक्यात गेल्याचा' आरोप केला आहे.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एकाच नावाची हवा आहे, ती म्हणजे अक्षय खन्ना! 'धुरंधर' या चित्रपटाने १००० कोटींचा आकडा पार केला आणि अक्षयच्या अभिनयाचं जगभर कौतुक झालं. पण सध्या अक्षय वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

advertisement
2/9
अत्यंत गाजलेल्या 'दृश्यम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागातून, म्हणजेच 'दृश्यम ३' मधून अक्षय खन्नाने माघार घेतली आहे. या एक्झिटमुळे निर्माते इतके भडकले आहेत की त्यांनी अक्षयवर 'यशाची हवा डोक्यात गेल्याचा' थेट आरोप केला आहे.

3/9
'धुरंधर'च्या तुफान यशानंतर अक्षय खन्नाने आपल्या मानधनात मोठी वाढ केली. त्याने 'दृश्यम ३' साठी चक्क २१ कोटी रुपयांची मागणी केली, जी निर्मात्यांच्या बजेटच्या बाहेर होती.

4/9
इतकंच नाही, तर त्याने आपल्या लूकसाठी 'विग' वापरण्याची अट घातली. मात्र, 'दृश्यम' हा एक फ्रँचायझी ब्रँड असल्याने लूक बदलणं चित्रपटाला महागात पडलं असतं. निर्मात्यांनी ही मागणी फेटाळली आणि तिथेच वादाची ठिणगी पडली.

5/9
चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "धुरंधर हिट झाला आणि त्याच दिवशी अक्षयने मेसेज करून चित्रपट सोडत असल्याचं सांगितलं. फोनही उचलले नाहीत. त्याला वाटतंय की चित्रपट त्याच्यामुळे चालला, पण तो रणवीर सिंगचा चित्रपट होता. आज अक्षयने सोलो चित्रपट केला तर तो ५० कोटीही कमवू शकणार नाही."
advertisement
6/9
निर्मात्यांनी पुढे सांगितलं की, १६ डिसेंबरपासून शूटिंग सुरू होणार होतं, सेटही उभारले गेले होते, पण अक्षयच्या वागणुकीमुळे ते सगळं तोडावं लागलं. यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून अक्षय खन्नाला लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे.

7/9
अक्षय खन्ना बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांनी वेळ न घालवता एका तगड्या अभिनेत्याची एन्ट्री केली आहे. आता अक्षयच्या जागी जयदीप अहलावत आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे.

8/9
कुमार मंगत पाठक यांच्या मते,
कुमार मंगत पाठक यांच्या मते, "आम्हाला अक्षयपेक्षा चांगला अभिनेता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस मिळाला आहे. जयदीप हा अभिनयाच्या बाबतीत अक्षयपेक्षा कित्येक पटीने सरस आहे."
advertisement
9/9
या सर्व हायव्होल्टेज ड्राम्यानंतर आता प्रेक्षकांचं लक्ष 'दृश्यम ३' च्या प्रदर्शनाकडे लागलं आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी सिनेगृहात धडकणार आहे. अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी पाहणं आता प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरणार आहे.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement