Do You Know : सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही महाग आहेत 'या' नॉन-वेज डिशेस; किंमत वाचून थक्क व्हाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
केवळ चवीसाठीच नाही, तर या गोष्टींच्या 'दुर्मिळतेमुळे' (Rarity) त्यांची किंमत गगनाला भिडलेली असते. चला तर मग जाणून घेऊया अशा काही नॉन-वेज पदार्थांबद्दल, जे खाणे हे केवळ श्रीमंतांचेच नाही, तर 'अति-श्रीमंतांचे' स्वप्न असते.
आपल्यापैकी अनेकांसाठी 'आलिशान जेवण' म्हणजे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील डिनर किंवा सुटसुटीत सजवलेली थाळी. विकेंडला बाहेर जेवायला गेल्यावर बिल थोडे जास्त आले तरी आपण कपाळावर आठ्या घालतो. पण तुम्हाला माहित आहे का? या जगात असे काही खाण्याचे पदार्थ आहेत ज्यांची किंमत एखाद्या लक्झरी कार किंवा सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही जास्त आहे.
advertisement
advertisement
1. अल्मास कॅविआर (Almas Caviar): खाण्यातील 'पांढरे सोने'इराणच्या कॅस्पियन समुद्रात आढळणारी 'एल्बिनो बेलुगा स्टर्जन' ही माशाची जात अत्यंत दुर्मिळ आहे. या माशाच्या अंड्यांपासून 'अल्मास कॅविआर' तयार केला जातो. विशेष म्हणजे, हा मासा जोपर्यंत 60 ते 100 वर्षांचा होत नाही, तोपर्यंत तो अंडी देत नाही.किंमत: सुमारे 43,500 डॉलर्स म्हणजेच साधारण 28 ते 30 लाख रुपये प्रति किलो. याची किंमत आणि दर्जा इतका उच्च असतो की, हे कॅविआर चक्क 24 कॅरेट सोन्याच्या डब्यात पॅक करून विकले जाते.
advertisement
2. ब्लूफिन टूना (Bluefin Tuna): जपानची शानजपानच्या सुशी संस्कृतीमध्ये 'ब्लूफिन टूना'ला सर्वोच्च स्थान आहे. या माशाच्या पोटाकडील भागाला 'ओटोरो' (Otoro) म्हणतात, जो आपल्या लोण्यासारख्या मऊ टेक्सचरसाठी ओळखला जातो. जपानमधील मासळी बाजारात या माशाचा लिलाव लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये होतो.किंमत: याच्या प्रीमियम कटची किंमत 4 ते 5लाख रुपये प्रति किलोपर्यंत असू शकते.
advertisement
3. अयाम सेमानी (Ayam Cemani): कोंबड्यांमधील 'लॅम्बोर्गिनी'इंडोनेशियात आढळणारी 'अयाम सेमानी' ही कोंबडी जगातील सर्वात विचित्र आणि महागड्या पक्ष्यांपैकी एक आहे. या कोंबडीचे फक्त पंखच नाही, तर मांस, हाडे आणि अंतर्गत अवयव देखील पूर्णपणे काळे असतात. इंडोनेशियामध्ये याला पवित्र आणि जादूई मानले जाते.: एका कोंबड्याची किंमत साधारण 2 लाख रुपयांपर्यंत असते. याच्या किमतीमुळेच याला 'कोंबड्यांमधील लॅम्बोर्गिनी' असे म्हटले जाते.
advertisement
4. वाग्यू बीफ (Wagyu Beef): मोजक्याच नशिबवानांना मिळणारी चवजपानचे 'वाग्यू बीफ' आपल्या मऊ आणि अप्रतिम चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. या मवेशींना (Cattle) अतिशय कडक नियमावलीत आणि विशेष वातावरणात पाळले जाते. त्यांच्या आहारात आणि संगोपनात कोणतीही कसर सोडली जात नाही.अस्सल जपानी वाग्यू बीफची किंमत साधारण 40 ते 50 हजार रुपये प्रति किलो इतकी असते.
advertisement
चव की स्टेट्स सिंबल?या सर्व खाद्यपदार्थांच्या किमती पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, या गोष्टी केवळ भूक भागवण्यासाठी नाहीत. शंभर वर्षांची प्रतीक्षा, कठीण संगोपन आणि दुर्मिळता यामुळे हे पदार्थ आज एक 'स्टेट्स सिंबल' बनले आहेत. एखाद्या सामान्य माणसासाठी या किमती धक्कादायक असल्या तरी, शौकीन लोकांसाठी ही एक सांस्कृतिक वारसा जपणारी चव आहे.










