अहिल्यानगरमध्ये गँगवारचा भडका, गोळीबारात एकाचा मृत्यू, हॉस्पिटलमध्येही मारामारी
- Reported by:Sahebrao Kokane
- Published by:Sachin S
Last Updated:
दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील
अहिल्यानगर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडल्यानंतर अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घोडेश्वरी हॉस्पिटल परिसरात नितीन शिरसाट आणि सुरज फुलमाळी यांच्यात वाद झाला. या वादातून गोळीबाराची घटना घडली. यात नितीन शिरसाट याचा मृत्यू झाला असून सुरज फुलमाळी जखमी झाला आहे. त्याच्यावर अहिल्यानगरमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर नितीन शिरसाट याचा मृतदेह शासकीय रुग्णात पाठवण्यात आला आहे.
advertisement
हॉस्पिटलमध्ये मारामारी
दरम्यान, खाजगी रुग्णालयात दोघांवरती उपचार सुरू असताना रुग्णालयातही दोन्ही गट समोरासमोर आल्याने डॉक्टर आणि परिचारिकांसमोरच हाणामारी झाली. शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात गोळीबाराचे नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं, तरी दोन्ही गटांतील जुना वाद यामागे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नितीन शिरसाट हे आपल्या मुलीला घेऊन दवाखान्यात गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
advertisement
शिरसाट आणि फुलमाळी गटात आधीही संघर्ष
घोडेगाव परिसर यापूर्वीही गँगवॉरच्या घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. नेवासा–श्रीरामपूर भागात वाळू तस्करी, अवैध धंदे आणि गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट असल्याने टोळी संघर्ष वारंवार होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे. सध्या शिरसाट विरुद्ध फुलमाळी या दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला असून काहींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या परिसरातील गुंडगिरी रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 8:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहिल्यानगरमध्ये गँगवारचा भडका, गोळीबारात एकाचा मृत्यू, हॉस्पिटलमध्येही मारामारी









