advertisement

Nanded: 'माझ्या बापाला अन् भावाला फाशी द्या', सक्षमच्या पार्थिवासोबत आंचलने केलं लग्न, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

Last Updated:

"आमच्या प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारलं. पण, ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला"

मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड: पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे.  प्रेम संबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर मुलीने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या, अशी मागणीच केली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकराच्या पार्थिवाशी तिने लग्न केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये ही घटना घडली. 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आँचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. 'तू दुसरा कुणीही आण पण हा नकोच! असं वारंवार सांगितलं गेलं. त्याला मारून टाकू अशीही धमकी देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं. आँचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली.
advertisement
सक्षमवर गोळ्या झाडल्या अन् दगडाने चेहरा ठेचला
25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामीडवर या दोघांचे प्रेमसंबंध होते. सक्षम ताटे आणि आँचलचा भाउ हिमेश मामीडवार दोघे मित्र होते. दोघांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. दीड महिन्यापूर्वी समक्ष जामिनावर सुटून आला होता. सक्षम आणि आँचलच्या प्रेम संबंधाची माहिती आँचलचे वडील गणेश मामीडवार यांना लागली. सक्षम दुसऱ्या जातीतला असल्याने या प्रेमाला आँचलच्या वडील आणि भावांचा विरोध होता. याच कारणातून आँचलचे वडील गणेश मामीडवार आणि भाऊ हिमेश आणि साहिल सोबत अन्य दोघांनी गुरूवारी रात्री नांदेड शहरांतील जुना गंज भागात सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या केली.
advertisement
आँचलने केलं सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न
शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षम सोबतच लग्न करणार असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आंचलने सक्षमच्या पार्थिवदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं.  "आमच्या प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारलं. पण, ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. माझ्यावर कुणाचीही जोर जबरदस्ती नाही. मी माझ्या वडिलांना आणि भावाला जिंकू देणार नाही. मी सक्षमची आहे आणि शेवटपर्यंत सक्षमचीच बनून राहणार' असं म्हणत आँचलने टाहो फोडला. तसंच, प्रियकराच्या मृत्यूनंतरही मी त्याचीच राहणार असा, निर्धार तरुणीने केला.
advertisement
दरम्यान, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आँचलने केली. दरम्यान, या खून प्रकरणी इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आँचलच्या वडील आणि भावासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: 'माझ्या बापाला अन् भावाला फाशी द्या', सक्षमच्या पार्थिवासोबत आंचलने केलं लग्न, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement