मोठी बातमी! माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात, कारने उडवलं; थरारक Video समोर
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांना काल सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपल्या नातवाला फिरवण्यासाठी बाहेर पडलेल्या निर्मला गावित यांना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला गावित या आपल्या नातवाला फिरवत रस्त्याच्याकडेने जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मागून धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की त्या रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना मदतीसाठी उचलून प्राथमिक उपचार दिले आणि रुग्णवाहिकेद्वारे नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
advertisement
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गावित यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 25, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात, कारने उडवलं; थरारक Video समोर


