शरद पवार गटावर दु:खाचा डोंगर, जळगावात माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन

Last Updated:

Former MLA Rajeev Deshmukh death: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झालं.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झालं. त्यांच्या निधनाने चाळीसगावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच देशमुखांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात चाळीसगाव विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीपूर्वी त्यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही शहराचे नेतृत्व केले होते. सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि संघटनेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
राजकीय वर्तुळात त्यांची एक अभ्यासू नेते म्हणून ओळख होती. आमदारकीनंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला होता. मात्र, सक्रिय राजकारणात ते कायम कार्यरत राहिले. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून त्यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत होते.
advertisement
स्थानिक राजकारणात पकड असलेले आणि सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारे नेते म्हणून राजीव देशमुख यांची प्रतिमा होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. चाळीसगावच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार गटावर दु:खाचा डोंगर, जळगावात माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement