Accident: अचानक यू टर्न घेतला अन् घात झाला; भरधाव ट्रक कारवर आदळला; तिघांचा जागेवर मृत्यू

Last Updated:

राष्ट्रीय महामार्गाने जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली.

Gadchiroli Accident
Gadchiroli Accident
गडचिरोली : राज्यातील रस्ते अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दररोज अपघाताच्या दुर्घटनेत प्रवाशांनी जीव गमावल्याचे वृत्त ऐकायले मिळते. कधी चार चाकी तर कधी दुचाकी वाहनांचे अपघात होतात. खराब रस्ते, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि हायस्पीड वाहनांमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गडचिरोलीच्या चार्मोशी येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अक्षरश: कारचा चेंदामेंदा झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गाने जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यात कारमधील तिन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेय तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना चामोर्शी शहरातील आष्टी- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर घडली. विनोद पुंजाराम काटवे (45), राजू सदाशिव नैताम (45) आणि सुनील वैरागडे (55) सर्व रा. गडचिरोली असे ठार झालेल्यांची नावे असून अनिल मारोती सातपुते (50) वर्ष, रा. चामोर्शी हे गंभीर जखमी आहेत.
advertisement

अचानक यु टर्न घेतल्याने भीषण अपघात

जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलवण्यात आले आहे. चारही जण कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यु टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

पुण्यात डंपरची पीकअपला धडक; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी, चालक फरार

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शिनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने पिकअप गाडीला धडक दिल्याने अपघातात झाला आहे. सागर कोळपे (वय - 28) आणि यश भिसे (वय - 12) या दोघांचा मृत्यू झाला. तर अनिल कोळपे हे गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला असून, शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident: अचानक यू टर्न घेतला अन् घात झाला; भरधाव ट्रक कारवर आदळला; तिघांचा जागेवर मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement