सेम टू सेम फुलनदेवीसारखं सरेंडर, डेंजर भूपतीने बंदूक खाली ठेवली; चंबळच्या खोऱ्यात 1983 ला काय घडलं?

Last Updated:

माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख असलेला भूपतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत ऐतिहासिक शरणागती पत्करली.

News18
News18
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली: माओवाद्यांचा म्होरक्या मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ भूपतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं.गेली चार दशकं देशभरातील पोलीस यंत्रणा भूपतीचा शोध घेत होती.पण दशकानुदशकं माओवादी हिंसाचारानं होरपळलेल्या गडचिरोली जिल्हा पोलिसांना भूपती शरण आल्यांना गडचिरोली जवळपास माओवादमुक्त झालाय.
12 फेब्रुवारी 1983 रोजी चंबळच्या खोऱ्यातील खुंखार डाकू फुलनदेवीनं मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आत्मसमर्पण केलं होतं. 42 वर्षांनी,त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. बुधवारी माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत अशीच ऐतिहासिक शरणागती पत्करली.
advertisement

जहाल माओवादी भूपतीचा काळा इतिहास

  • मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा माओवादी नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे.
  • तेलंगणातील पेडापल्ली इथला रहिवासी असलेला भूपती 40 वर्षापासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे.
  • 1970च्या दशकात भूपतीनं माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केलेला
  • तेव्हापासून अनेक मोठ्या माओवादी हल्ल्यात त्याचा सहभाग उघड झालेला
  • शस्त्र प्रशिक्षण तसेच माओवादी हल्ल्याचं प्लानिंग करण्यात तो माहीर आहे
  • माओवादी चळवळीत भूपतीची माओवाद्यांचा 'थिंक टँक' अशी ओळख होती
  • त्यामुळंच देशभरात भूपतीवर 6 कोटीपेक्षा अधिकची बक्षिसं होती.
  • भूपतीची पत्नी तारक्कानं अलीकडेच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्पण केलं होतं.
advertisement

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शस्त्र खाली ठेवली

सरकारनं माओवाद्यांविरोधातील अभियानाला गती दिल्यानंतर जहाल माओवादी भूपतीनं 'हिंसेचा मार्ग सोडा,विकासाच्या प्रवाहात सामील व्हा' ही हाक ऐकली शरण येण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांकड एक अट ठेवली. भूपतीची ती अट होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करण्याची. पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी भूपतीची ही अट मान्य केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ऐनवेळी सोलापूरचा विमानप्रवास टाळून गडचिरोलीत दाखल झाले. भूपतीनं त्याच्या 60 साथीदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शस्त्र खाली ठेवली.
advertisement

गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त

एकेकाळी जंगलात दहशत पसरवणाऱ्या माओवादी भूपतीनं सरकार आणि पोलिसांनी विश्वास दाखवला. भूपतीसारखे शेकडो माओवादी शस्त्र सोडून मुख्यप्रवाहात सामील झाले आहेत. सरकारनंही त्यांना विकासाच्या माध्यमातून बदलाची हमी दिलीय. त्यामुळं आज गडचिरोली जिल्हा जवळपास माओवादमुक्त झालाय.

नक्षल चळवळीला मोठा धक्का

भूपती हा माओवादी संघटनेतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानला जातो. त्याच्याविरुद्ध अनेक राज्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर अनेक इतर नक्षलवादी देखील शरणागती पत्करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सेम टू सेम फुलनदेवीसारखं सरेंडर, डेंजर भूपतीने बंदूक खाली ठेवली; चंबळच्या खोऱ्यात 1983 ला काय घडलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement