advertisement

गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चार माओवादी ठार

Last Updated:

मृत माओवादींची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले दहशतवादी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

News18
News18
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादी चळवळीविरोधात निर्णायक कारवाई झाली आहे. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या कोपर्शी जंगलात गडचिरोली पोलिस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवादींचा समावेश असून घटनास्थळावर त्यांचे मृतदेह सापडले आहेत. या कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही मिळाला आहे.
advertisement
गडचिरोली जिल्ह्यातील सी-६० (C-60) या विशेष पथकाला गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान माओवादी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि दोन्ही बाजूंमध्ये काही वेळ चकमक रंगली. या कारवाईत चार माओवादी ठार पडले असून, उर्वरित माओवादी जंगलात लपून बसल्याचा अंदाज आहे. सध्या त्या भागात पावसामुळे अडथळे निर्माण होत असले तरी जवानांची शोधमोहिम सुरू आहे.
advertisement

मोठा शस्त्रसाठा सापडला

मृत माओवादींची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले दहशतवादी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी बंदुका, काडतूस, तसेच नक्षलविरोधी साहित्य जप्त केले आहे. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जंगलात शोधमोहिम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement

सीमेवर नक्षलवाद्यांची सतत हालचाल

गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांची सतत हालचाल सुरू असते. नक्षलवाद्यांना  रोखण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या आहेत. यापूर्वीही अशा मोहिमांमध्ये अनेक माओवादी ठार झाले आहेत. आजच्या कारवाईमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे. या चकमकीनंतर जिल्ह्यातील परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चार माओवादी ठार
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement