Gondia News : तरुणावर चाकूचे सपासप वार; दिवाळीच्या दिवशीच खूनाच्या घटनेनं गोंदिया हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
गोंदिया, 13 नोव्हेंबर, रवी सपाटे : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणावर चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. बाबू असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान तरुणाचा खून झाल्याची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऐन सणाच्या दिवशीच गोंदियात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. बाबू असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली. तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
advertisement
गोंदिया येथील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल टोली परिसरातील गुजराती शाळेसमोर चाकूनं वार करत या तरुणाची हत्या करण्यात आली. रात्री गोंदिया शहरात दिवाळी निमित्त अनेक जण आपल्या कुटुंबासोबत रात्री उशिरापर्यंत रांगेळी पाहण्यासाठी शहरात फिरत असतानाच ही घटना घडली आहे. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
November 13, 2023 10:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : तरुणावर चाकूचे सपासप वार; दिवाळीच्या दिवशीच खूनाच्या घटनेनं गोंदिया हादरलं









