Hingoli News : हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता, 17 दिवसांपासून कुटुंबियांशी संपर्कच नाही...नेमकं काय घडलं?

Last Updated:

हिंगोलीचे अभियंता असणारे योगेश नांदेड हे सिडको भागात राहतो. तर त्यांचे आई-वडील भाऊ हे वसमत शहरात राहतात. योगेश यांनी काही दिवसांपूर्वी श्रीयोग एक्स्पोर्ट नावाने कंपनीची नोंदणी केली आहे.

Hingoli News News
Hingoli News News
Hingoli News : मनीष खरात, हिंगोली : हिंगोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत हिंगोलीचा वसमत शहरातील तरूण अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. खंर तर योगेश इराणला गेल्यापासून कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. तब्बल 17 दिवस कुटुंबियांच त्यांच्याशी बोलणं झालं नसल्याची माहिती आहे.खरं तर योगेश इराणला गेला मात्र त्याच्या परतीच्या प्रवासाच्या दिवशी तो विमानात बसला नव्हता.त्यात त्याचा कुटुंबियांशी संपर्कच होत नाही आहे. त्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहे. या प्रकरणी आता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे अभियंता असणारे योगेश नांदेड हे सिडको भागात राहतो. तर त्यांचे आई-वडील भाऊ हे वसमत शहरात राहतात. योगेश यांनी काही दिवसांपूर्वी श्रीयोग एक्स्पोर्ट नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. आणि याच व्यवसायासंदर्भात ते इराणमध्ये सादिक नावाच्या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेले असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे.
गेल्या 5 डिसेंबर रोजी योगेश भारतातून इराणमध्ये गेले होते. त्यानंतर इराणमधील तेहरान शहरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी व मुलाशी व्हिडिओकॉल द्वारे संपर्क केला होता. मात्र 7 डिसेंबर पासून त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यात 11 डिसेंबर रोजी त्यांचा परतीचा प्रवास होता. त्यामुळे कुटुंबीयांनी विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला परंतु ते विमानात बसले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
advertisement
तसेच कुटुंबीयांनी इराण मधील भारतीय दूतावासाशी देखील संपर्क केला परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती योगेश यांच्या भावाने दिली आहे. त्यामुळे आता हे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. याप्रकरणी योगेश यांची पत्नी श्रद्धा पांचाळ यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli News : हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता, 17 दिवसांपासून कुटुंबियांशी संपर्कच नाही...नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement