advertisement

Jalgaon: श्रीखंड-पुरी नाही, घरात वाहिला रक्ताचा पाट, गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने घरच्या 'लक्ष्मी'ला संपवलं!

Last Updated:

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीची हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव: मराठी नव वर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याच्या सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेऊन गुढीपाडव्याच्या सणाचा गोडवा आणखी वाढवण्यात आला. पण, जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून नवऱ्याने आपल्याा पत्नीची लोखंडी विळ्याने वार करून हत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून ऐन गुढीपाडव्याचा दिवशी या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या निमखेडी इथं कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिपाली नितीन सोनवणे असं मयत महिलेचं नाव आआहे.  तर नितीन सोनवणे असं आरोपीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? 
नितीन विजय सोनवणे हा आरोपी  मयत महिला दिपाली सोनवणे आणि आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होता. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नितीन सोनवणे यांचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. आज दुपारी पुन्हा वाद उफाळून आला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांमध्ये झटापट झाली,  संतापाच्या भरात नितीनने  लोखंडी विळ्याने पत्नी दिपालीच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घरात पत्नीचा खून केला. घरात सर्वत्र रक्त माखलं होतं.
advertisement
पत्नीचा खून  केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दिपालीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीची हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: श्रीखंड-पुरी नाही, घरात वाहिला रक्ताचा पाट, गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने घरच्या 'लक्ष्मी'ला संपवलं!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement