gopinath munde jayanti : 'भविष्यात काय होईल माहिती नाही, पण...'डोळ्यात पाणी आणणारी पंकजा मुंडेंची बाबांसाठी कविता
- Published by:sachin Salve
Last Updated:
'उद्या पंकजा मुंडे जरी राहिली नाही तरीही गोपीनाथ मुंडे यांचे विचार कायम राहिले पाहिजे. मुंडे साहेबांचे स्वप्न हे तुमच्यासाठी होते म्हणून मला तुमच्या पदरात टाकलं'
बीड, 12 डिसेंबर : 'भविष्यात काय होईल माहिती नाही, पण वाईट काहीच घडणार नाही. कसोटीच्या काळात निर्णय घेताना तुमची पंकजा कुठेच कमी पडणार नाही' अशी कविता म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
भाजप नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नतमस्तक झाल्या. यावेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थित होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी बाबा गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल भावना व्यक्त केली, तसंच एक कविताही म्हटली.
'मी याच ठिकाणी 2014 दिवशी इथं भाषण केलं होतं. गोड जेवणाचा कार्यक्रम होता. त्यावेळी बाबांना मी म्हणाले होते, 2014 मध्ये मी मुक्त झाले असे माझ्या बाबाला म्हटलं होतं. हे दुःख कोणाच्या वाट्याला येवू नये. शत्रूच्या वाट्यालाही येऊ नये. तुमच्यासह सगळ्यांच्या डोक्यावरच छत्र हरपलं. मुंडे साहेबांचे विचार कोण पुढे नेणार, कोण वारसा चालवणार हा मोठा प्रश्न होता. पण त्यानंतर मीच इथं भूमिपूजन केलं आणि गोपीनाथ गड उभा राहिला. मुंडे साहेबांचे विचार गावा गावात पोहोचले पाहिजे, असं आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं.
advertisement
यावेळी मिरगे आणि माणरुकर यांनी त्यांच्यासाठी लिहिलेली कविता वाचून दाखवली.
मुंडे साहेबांची कविता...
लक्ष लक्ष आशीर्वाद घेऊन तुमच्या प्रतिमाचं पूजन करते.
आज जयंतीच्या दिवशी बाबा तुम्हाला विनम्र अभिवादन करते.
भविष्यात काय होईल माहिती नाही, पण वाईट काहीच घडणार नाही.
कसोटीच्या काळात निर्णय घेताना तुमची पंकजा कुठेच कमी पडणार नाही.
परळीमध्ये येताना आणि जाताना मन सैरभैर होतं, मुद्दाम गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेते.
advertisement
बाबा कुठे आहात तुम्ही, वेळ काढून पंकूताईला आशीर्वाद द्या..
उपेक्षेचा एक एक क्षण मी जगत गेले, प्रत्येक वेळी बाबा मी तुम्हाला माझ्यात पाहत गेले.
भरभरून जनतेची सेवा केली, मागे पाहून कधी दमली नाही.पोटात एक ओठात एक कधी जमलं नाही.
राजकारणात कधी कुणाचा अनादर केला नाही. दारात आलेला कुणाला नाराज केला नाही.
advertisement
बाबा तुमचं आभाळा ऐवढं कार्य खूप मोठं आहे, स्टेज वरील भाषण असो की दौरा कधीच एकटा केला नाही.
तुम्ही अचानक निघून गेला. सता असो किंवा नसो तुम्ही राजा सारखं जगून गेलात.
तसंच, 'गावागावात विचार पोहोचले पाहिजे. शंभर वर्ष जगले पाहिजे हे आम्हाला वाटत होत. पण साहेबांनी संधी दिली नाही. माझा बाप शंभर वर्ष जगाला पाहिजे ही मुलगी म्हणून माझी जबाबदारी आहे. मुंडे साहेबांचे विचार शतायुषी व्हावे. जनता हा संकल्प पूर्ण करेल, अशी भावनाही पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.
advertisement
उद्या पंकजा मुंडे जरी राहिली नाही तरीही गोपीनाथ मुंडे यांचे विचार कायम राहिले पाहिजे. मुंडे साहेबांचे स्वप्न हे तुमच्यासाठी होते म्हणून मला तुमच्या पदरात टाकलं. आपला संघर्ष चालणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
December 12, 2023 3:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
gopinath munde jayanti : 'भविष्यात काय होईल माहिती नाही, पण...'डोळ्यात पाणी आणणारी पंकजा मुंडेंची बाबांसाठी कविता