advertisement

Jalgao : स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान, त्याआधीच डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, जळगाव हादरलं

Last Updated:

स्वातंत्र्यदिनी जळगाव जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंजन विहीरे येथे डॉक्टर व्ही.आर.पाटील यांनी त्यांचं जीवन संपवलं आहे.

जळगावमध्ये डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नदीत उडी घेऊन संपवलं आयुष्य
जळगावमध्ये डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नदीत उडी घेऊन संपवलं आयुष्य
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनी जळगाव जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंजन विहीरे येथे डॉक्टर व्ही.आर.पाटील यांनी त्यांचं जीवन संपवलं आहे. तापी नदीच्या पुलावरून उडी मारून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. 15 ऑगस्टनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर व्ही.आर.पाटील यांचा सन्मान होणार होता, पण त्याआधीच्या त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
डॉक्टर व्ही.आर.पाटील यांनी ताप नदीच्या पुलावर त्यांची कार लावली, यानंतर ते गाडीतून उतरले आणि तापी नदीच्या पुलावरून उडी मारली. या घटनेनंतर धरणगाव पोलीस दाखल झाले. डॉ. व्ही.आर.पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
डॉ.व्ही.आर.पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानासाठी निघाले होते तेव्हाच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. डॉ.व्ही.आर.पाटील हे पाळधीचे रहिवासी होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgao : स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान, त्याआधीच डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, जळगाव हादरलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement