advertisement

Suryakumar Yadav : जितेश शर्माला वर्ल्ड कप स्कॉडमधून अचानक का वगळलं? सूर्यकुमारने सांगितली सिलेक्शनची इनसाईड स्टोरी!

Last Updated:

Suryakumar Yadav On Jitesh Sharma : जितेश शर्माच्या जागी ईशान किशनला संधी मिळाली अन् ईशानने त्याचं सोनं केलं. त्यावरच आता सूर्यकुमार यादव याने खुलासा केला आहे.

Suryakumar Yadav On Jitesh Sharma
Suryakumar Yadav On Jitesh Sharma
Suryakumar On Why Jitesh Sharma Drop : तीन महिन्यापूर्वी टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जितेश शर्मा... गेली दोन वर्ष टीम इंडियामध्ये खेळवून जितेश शर्माला ऐन वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी दिली नाही. मात्र, सूर्याचा निर्णय टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरला. जितेश शर्माच्या जागी ईशान किशनला संधी मिळाली अन् ईशानने त्याचं सोनं केलं. त्यावरच आता सूर्यकुमार यादव याने खुलासा केला आहे.

निर्णय माझ्या 'गट फीलिंग'वर घेतला - सूर्यकुमार यादव

जितेश शर्माला डच्चू देऊन इशान किशनला टीममध्ये घेणं हा निर्णय त्याच्या 'गट फीलिंग'वर आधारित होता. "जितेशला वगळताना मला नक्कीच वाईट वाटलं, कारण तो गेल्या एक ते दीड वर्षांपासून टीमसोबत होता आणि चांगली कामगिरीही करत होता. जर तो खेळला नसता, तर गोष्ट वेगळी असती. पण टॉप ऑर्डरमध्ये आम्हाला 'एक्स-फॅक्टर' आणि फायर पॉवर हवी होती. डाव्या-उजव्या हाताच्या फलंदाजांचं समीकरण हवं होतं, त्यामुळे कोणाला तरी बाहेर बसवणं गरजेचं होतं.
advertisement

घरगुती क्रिकेटमध्ये अतोनात परिश्रम

जेव्हा तो दीड वर्ष टीममधून बाहेर होता, तेव्हा त्याने घरगुती क्रिकेटमध्ये अतोनात परिश्रम घेतले. इशानने भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन सराव सामने खेळले आणि स्वतःच्या खेळावर काम केलं होतं. इशानकडे कोणतंही मानसिक ओझे नव्हतं आणि इशानने न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजपासूनच आपली क्षमता सिद्ध करण्यास सुरुवात केली होती, असं सूर्यकुमारने पीटीआयशी बोलताना यावेळी सांगितलं.
advertisement
advertisement

छोटू वर्ल्ड कप जितायेंगा?

ईशान किशनला मी फोन केला अन् विचारलं छोटू वर्ल्ड कप जितायेंगा? त्यावेळी तो मला एकच वाक्य म्हणाला. बस आप भरोसा कर के देखींये... त्यावर मी त्याला रिप्लाय केला, चल किया भरोसा... आणि तो संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये खेळला ते कमाल होतं, असंही सूर्यकुमार यादव यावेळी म्हणाला.
advertisement

जितेशच्या वडिलांचं निधन

दरम्यान, वर्ल्ड कप सुरू असताना जितेशचे वडील मोहन शर्मा यांचे 1 फेब्रुवारी रोजी एका छोट्या आजारानंतर निधन झाले. त्याने सांगितले की, त्यावेळी तो सात दिवस आपल्या वडिलांसोबत होता आणि त्याच दरम्यान त्याला जाणवले की, त्याच्यासाठी कुटुंब हे जगापेक्षाही अधिक महत्त्वाचे होते. विश्वचषकापेक्षा माझ्या वडिलांना माझी जास्त गरज होती, असं जितेश शर्मा म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : जितेश शर्माला वर्ल्ड कप स्कॉडमधून अचानक का वगळलं? सूर्यकुमारने सांगितली सिलेक्शनची इनसाईड स्टोरी!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement