Jalna: जालन्यात वाळू माफियांचं थैमान,तहसीलदाराच्या अंगावर घातला ट्रक्टर; अंबड येथील भयंकर घटना

Last Updated:

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

News18
News18
जालना: वाळू माफियांचा हैदोस किंवा वाळू माफियांकडून सातत्याने वाळू उपसा करताना गुंडगिरी व दहशत माजवली जाते. अनेकदा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला, मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. वाळू हा विषय पोलीस खात्यापेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांशवेळा जीव मुठीत धरुन कारवाई करावी लागते. नुकतेच जालन्यात वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आलीय. अंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूमाफियाकडुन थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला आहे.

आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला आहे. तहसीलदार चव्हाण यांनी चार राऊंड फायर केले, त्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. दरम्यान आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
advertisement

महसूल आणि  पोलिस प्रशासन हतबल

मागील काही दिवसांपासून वाळू उपसा करण्याचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अनेक मंडल अधिकारी व तलाठ्यांवर गेल्या वर्षभरात अनेक जीवघेणे हल्ले झाले आहेत. वाळू माफियांच्या परस्पर टोळी युद्धात खून मारामाऱ्या होत आहेत. अनेक मंडल अधिकारी व तलाठ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पिस्तूल परवाना देण्यासाठी अधिकृत अर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. वाळू चोरी त्यातून गुन्हेगारी सामाजिक तणाव यामुळे महसूल व पोलिस प्रशासन हतबल आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna: जालन्यात वाळू माफियांचं थैमान,तहसीलदाराच्या अंगावर घातला ट्रक्टर; अंबड येथील भयंकर घटना
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement