शेतात साप सुद्धा येणार नाही जवळ, जालन्याच्या दिपालीने बनवली खास शिवकाठी!
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:sachin Salve
Last Updated:
रात्रीच्या वेळी अंधारात शेतकऱ्यांना ही काठी आधार म्हणून काम करणार आहे. या काठीची तब्बल 35 वेगवेगळी उपयोग आहेत.
नारायण काळे, प्रतिनिधी
घनसावंगी : जालना जिल्ह्यातील शिंदे वडगाव येथील तरुणी दिपाली भुतेकर हिने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेतकरी शिव काठीची निर्मिती केली आहे. रात्रीच्या वेळी अंधारात शेतकऱ्यांना ही काठी आधार म्हणून काम करणार आहे. या काठीची तब्बल 35 वेगवेगळी उपयोग आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला वीज पुरवठा तपासणी, साप, विंचुसह वन्य प्राण्यांपासून संरक्षणासह बॅटरीचाही समावेश असलेली काठीचा यशस्वी प्रयोग घनसावंगी मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थिनीने केला आहे. ही काठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील दिपाली गणेशराव भुतेकर ही विद्यार्थीनी मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. शालेय जिवनापासून सुरू असलेल्या प्रयोगाचे रूपांतर बहुपयोगी काठीमध्ये दिपालीने केला आहे. प्लास्टिक पाईपपासून बनवलेली ही काठी ज्यामध्ये बॅटरीचे सेल आणि व्हायब्रेशन बसवलेली आहे. काठी जमिनीवर टाकताच जमिनीवर व्हायब्रेशन होवून आठ ते दहा फुटावरील सरपटणारे प्राण्यांना सावध करते. तसंच वन्य प्राण्यांपासून संरक्षण घेण्यासाठी यात चाकुही दिला आहे. तसंच वीज मोटार सुरू करण्याचे साधन टेस्टर, फ्युजचे वायर आणि मधमाशांपासून बचाव करण्यासाठीही साहित्य, शेळ्यांसाठी चारा फळे तोडण्यासह मासे पकडण्यासाठी हुक, शिवाय जीपीएस सिस्टीमचाही समावेश करण्यात आला आहे.
advertisement
ही शेतकरी शिवकाठी बनवण्यासाठी दिपाली भुतेकर यांना अडीच हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. मात्र यामध्ये बदल करून हा खर्च हजार ते बाराशे रुपयांपर्यंत कमी करता येऊ शकतो. यापूर्वी विविध विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरावर हा प्रयोग निवडला. तसंच आयआयटी दिल्ली येथे सुद्धा त्यांनी आपला प्रोजेक्ट सादर केला होता.
नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरच्या माध्यमातून मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये तिच्या या बहु उपयोगी काठीला प्रथम पुरस्कार मिळवून विभागीय स्तरावर तिची निवड झालेली आहे. सुप्रसिद्ध उद्योजक सुनील भाई रायठठ्ठा यांनी ही काठी पाहून प्रशंसा करत साडेपाचशे काठींची ऑर्डर दिपालीला दिली आहे.
advertisement
"शिक्षण घेत असलेल्या तरुण-तरुणींनी आपल्या आजूबाजूला असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. वेगवेगळ्या मोठ्या विषयांना हात घालण्याऐवजी आपल्या जवळच असलेल्या छोट्या छोट्या विषयातूनच मोठमोठे शोध लागतात. स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगत असतो मात्र समाजासाठी आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी यासाठी आपण प्रयत्नच राहणार" असल्याचं दिपाली भुतेकर हिने सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 16, 2024 10:24 PM IST








