advertisement

BMC Election : मुंबईमध्ये राज ठाकरेंना पहिल्या विजयाची चाहूल, भाजपला मोठा धक्का, दोन उमेदवार बाद!

Last Updated:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागली आहे. भाजपचे दोन उमेदवार बाद झाल्यामुळे मनसेच्या जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबईमध्ये राज ठाकरेंना पहिल्या विजयाची चाहूल, भाजपला मोठा धक्का, दोन उमेदवार बाद!
मुंबईमध्ये राज ठाकरेंना पहिल्या विजयाची चाहूल, भाजपला मोठा धक्का, दोन उमेदवार बाद!
मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. सर्व 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली, पण मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे दोन उमेदवार बाद झाले आहेत . वॉर्ड क्रमांक 211 आणि वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या दोन उमेदवार बाद झाल्यामुळे भाजपवर नामुष्की ओढावली आहे.
वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपने मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म दिला होता, पण तरीही खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकली. फॉर्म भरण्यासाठी मंदाकिनी खामकर 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने खामकर यांचा अर्ज दाखल करून घेतला नाही. दुसरीकडे वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती, पण कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही.
advertisement

मनसेचा विजय सोपा झाला?

वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या वॉर्डातला मनसेचा विजय सोपा झाल्याची चर्चा आहे. या वॉर्डामध्ये मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना ठाकरे बंधूंच्या युतीतून उमेदवारी मिळाली आहे. तर याच वॉर्डात अरुण गवळीची कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काँग्रेस आणि अपक्षांनीही उमेदवार रिंगणात उतरवले असले तरीही मनसेच्या श्रावणी हळदणकर यांचं पारडं जड वाटत आहे.
advertisement

मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू

मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचा सामना ठाकरे बंधूंविरुद्ध होत आहे. याचसोबत मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही युती झाली आहे. मुंबईतल्या 227 जागांपैकी भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर लढत आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना उबाठा 163, मनसे 53 आणि राष्ट्रवादी शरद पवार 11 जागांवर लढेल. काँग्रेसने 155 आणि वंचित बहुजन आघाडीने 62 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election : मुंबईमध्ये राज ठाकरेंना पहिल्या विजयाची चाहूल, भाजपला मोठा धक्का, दोन उमेदवार बाद!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement